भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वासोबत कधी तडजोड केली नाही, करणार नाही – राजनाथ सिंह

सेलम : वृत्तसंस्था – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तमिळनाडुच्या सेलममध्ये रविवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या संमेलनाला संबोधित केले. संरक्षण मंत्र्यांनी म्हटले की, भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वासोबत आम्ही कधीही तडजोड केली नाही, करणार नाही. एलएसीवरील वादाच्या मुद्द्यावर लष्कराच्या परतीच्या दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, भारत आणि भारताच्या नागरिकांचे मस्तक कधीही झुकू देणार नाहीत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर सुद्धा हल्लाबोल केला. त्यांनी विचारले की, काँग्रेस पक्षाला भारतीय लष्कराच्या शौर्यावर आणि धाडसावर संशय आहे का? काँग्रेस लष्करावर प्रश्न उपस्थित करून गलवानमध्ये आपले सर्वोच्च बलिदान देणार्‍या वीर सुपूत्रांचा अपमान करत नाही का? काँग्रेस आणि द्रमुकचे मॉडेल भ्रष्टचार आणि तुष्टीकरणावर अधारित आहे. ते ज्याप्रकारच्या तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत ते तामिळनाडुच्या सामाजिक स्थितीला कमजोर करत आहे.

संरक्षण मंत्र्यांनी म्हटले की, विकासाचे कोणतेही मॉडल किती मजबूत आहे त्याची खरी चाचणी तर तेव्हाच होते जेव्हा एखादा देश संकटाचा सामना करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कौशल्याने देशाला या आव्हानाचा सामना करण्यासाठी ज्या प्रकारे तयार केले आहे ती खुपच अविश्वसनीय आणि प्रेरणादायक कथा आहे. याच कौशल्यामुळे आपण कोरोनावर नियंत्रण मिळण्यात यश मिळवले तसेच महामारी रोखण्यासाठी ’मेक इन इंडिया’ व्हॅक्सीन बनवण्यात सुद्धा यश मिळवले आहे.

संरक्षण मंत्र्यांनी म्हटले की, कोरोना महामारीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा वाईट परिणाम पडला होता परंतु आमच्या सरकारने असे काम केले की, आता आयएमएफने सुद्धा म्हटले आहे की, 2021-22 मध्ये भारताचा जीडीपी 11 टक्केपेक्षा सुद्धा जास्त असेल. आज आपण कोविड लसीचा वापर केवळ देशातच करत नसून दुसर्‍या देशांना सुद्धा व्हॅक्सीन देऊन त्यांना मदत करत आहोत.