डेडबॉडी सूटकेसमध्ये ठेवून रेल्वेतून फेकली , विवाहबाह्य संबंधातून खून

नवी दिल्ली : दिल्लीतील एका ४६ वर्षे उद्योजकाचा खून करून त्याचा मृतदेह चालत्या ट्रेनमधून गुजरातमध्ये फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. विवाहबाह्य संबंधातून ही घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव निरज गुप्ता असे आहे. त्याचे डोके विटेने ठेचण्यात आलं. त्यानंतर त्याला भोसकण्यात आलं होतं. तसेच त्याचा गळाही करण्यात आला होता. हा मृतदेह चक्क सुटकेसमध्ये भरण्यात आला होता.

पोलीस उपायुक्त विजयंता आर्या यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ज्या महिलेशी विवाहबाह्य संबंध होते तिने दुसर्‍याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णय घेतल्याबद्दल गुप्ता यांनी आक्षेप घेतला होता. मृत निरज गुप्ता हे करोल बागमध्ये एक फायनान्स फर्म चालवायचे. ते आपल्या पत्नी आणि मुलांसोबत दिल्लीत आदर्श नगर येथे राहायचे. १४ नोव्हेंबर रोजी गुप्ता यांच्या एका मित्राने त्यांच्या गायब होण्याची तक्रार नोंदवली होती. त्यांच्या पत्नीने एफआयआर देखील दाखल केले होते.

गुप्ता यांच्या पत्नीने सांगितलं, की गेल्या दहा वर्षांपासून ते २९ वर्षीय फैजल नावाच्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंधात होते. ही माहिती मिळाल्याबरोबर पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला. या महिलेला त्यांनी अटक केली. तसेच तिचा होणारा पती जुबेर आणि तिच्या आई शाईनला ही अटक करण्यात आली. जेव्हा गुप्ता फैजल जुबेर सोबत लग्न करते हे समजलं तेव्हा त्यांनी तिला असं न करण्याचा सल्ला दिला. तसेच ते तिच्या घरी १३ नोव्हेंबर ला राहिले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतापलेल्या दुबे यांनी गुप्ता यांचे विटेने डोके फोडले. त्यानंतर त्याने त्यांच्यावर तीन वेळा वार केले आणि चाकूचा वापर करून त्यांचा गळा कापला. या मृतदेहाचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी एका सुटकेसमध्ये या मृतदेहाला भरलं. ही सुटकेस त्यांनी राजधानी एक्सप्रेसमधून गुजरातला जाताना फेकून दिली.