EXIT POLL : ‘पोल ऑफ पोल्स’ नुसार 50 जागांवर ‘आप’, तर ‘भाजप’ ला 19, ‘काँग्रेस’ ला 1 जागा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली एग्जिट पोल 2020 चे आकडे समोर येऊ लागले आहेत. दिल्लीत 70 जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले. सीएए विरोधात आंदोलन झालेल्या शाहीन बागसह अनेक भागात मतदान केंद्रावर मतदारांची लांबलचक रांग लागल्याचे पाहायला मिळाले. या निवडणूकीत आपची थेट लढत भाजपशी होती. आता एग्जिट पोल समोर येत आहे. यात आम आदमी पार्टीला सरकार बनवण्याचा संधी पुन्हा मिळाल्याचे दिसत आहे.

पोल ऑफ पोल्सने आपला 50, भाजपला 19 आणि काँग्रेसला 1 जागा मिळेल असा अंदाज वर्तवला आहे.
सुदर्शन न्यूजच्या मते आपला 40 – 45 जागा, तर भाजपला 24 – 28 जागा आणि काँग्रेसला 2 – 3 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवला आहे.
– न्यूज एक्सने आपला 53 – 57 जागा, भाजपला 11 – 17 जागा आणि काँग्रेसला 0 – 2 जागा असा अंदाज वर्तवला आहे.
टाइम्स नाऊ इप्सॉपच्या एग्जिट पोलनुसार 44 जागा आपला, 26 जागा भाजपला, तर काँग्रेसला शून्य जागा मिळतील असा अंदाज आहे.
ABP न्यूज सी – वोटर नुसार आपला 52 टक्के मतदान झाले. भाजपला 40 टक्के तर काँग्रेसला 6 टक्के मतदान झाले.
टीव्ही 9 भारतवर्षच्या मते आपला 54 जागा, भाजपला 24 -28 जागा, तर काँग्रेसला 1 जागा मिळेल.
– रिपब्लिक टीव्हीच्या एग्जिट पोल नुसार आपला 48 – 61 जागा, भाजपला 9 ते 21 जागा तर काँग्रेसला 0-1 जागा मिळेल.

ABP- C वोटर एग्जिट पोल –
चांदनी चौक एकूण जागा – 10
आप 7 – 9 जागा 52 टक्के मतदान, भाजप – 1 ते 3 जागा 40 टक्के मतदान, काँग्रेस – 0 – 1 जागा 5.6 टक्के मतदान शेअर असेल.