JNU हिंसाचाराचे ‘पडसाद’ औरंगाबादमध्ये, राष्ट्रवादीचा भाजप कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काल झालेल्या हिंसाचाराचे पडसाद औरंगाबादमध्ये उमटले आहेत. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेनं आज आक्रमक आंदोलन केले. काल जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटाने लोखंडी रॉड आणि सळ्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. या हिंसाचारावरुन डाव्या विद्यार्थी संघटना आणि भाजपची संबंधीत असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

रविवारी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा राजकीय नेते आणि सेलिब्रेटींनी देखील याचा निषेध केला केला आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या युवक संघटनेने भाजपच्या शहर कार्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. 25 ते 30 कर्यकर्ते भाजप कार्यालयाजवळ आले होते. त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी करत कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सकाळपासूनच या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. त्यांनी संतप्त विद्यार्थ्यांना भाजप कार्यालयात जाण्यापासून रोखत त्यांचा डाव उधळला गेला असल्याचा दावा भाजपने केला आहे.

नाशिकमध्येही राडा
नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने या ठिकाणचे वातावरण तापले होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ABVP च्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्याने ABVP चे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/