महामार्गावर तब्बल 12 तास युवकाच्या अंगावरून गेली हजारो ‘वाहने’, पोलिसांनी गोळा केले मृतदेहाचे ‘तुकडे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली – लखनऊ हायवे मार्गावर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या हायवेवर रस्ता ओलांडताना एकाचा मृत्यू झाला, दरम्यान मृत्यूनंतर तब्बल 12 तास त्याचा मृतदेह हायवेवर तसाच पडून होता, मात्र कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. महत्वाचे म्हणजे याच मार्गावरून 10 ते 15 वेळा पोलिसांची गाडी गेली. मात्र या मृतदेहाकडे कोणाचे लक्ष नव्हते. शनिवार (22 फेब्रुवारी) ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी हायवे ओलांडताना एका भरधाव वाहनानं त्या व्यक्तीस धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती कि त्याचा जागीच मृत्यू झाला, दरम्यान, ज्या गाडीने त्याचा अपघात झाला तो गाडीवाला थांबलाही नाही. त्यानंतर तब्बल 12 तास हजारो गाड्या या मृतदेहावरून गेल्या, मात्र कोणीही याकडे लक्ष दिले नाही. अपघात झालेल्या तरुणाच्या मृतदेहाची अत्यंत वाईट परिस्थिती झाली होती. घटनेच्या सुमारे 13 तासानंतर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाचा बारीक चुरा झाला होता. ज्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवणेही अवघड आहे. तरी पोलिसांनी मृतदेहाच्या कपड्यावरून त्याचे लिंग ओळखण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर, पोस्टमार्टमसाठी हा मृतदेह पाठवण्यात आला आहे. गुजराला पोलीस स्थानकाचे मुख्य अधिकारी जयवीर सिंग यांनी, DNA रिपोर्टही काढला, मात्र अद्याप मृतहेदाची ओळख पटलेली नाही.

पुणे – मुंबई एक्सेप्रेस वेवरही घडला होता असाच प्रकार :
गेल्याच आठवड्यात अशीच एक घटना पुणे – मुंबई एक्सेप्रेस वेवर घडली होती. या महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जवळपास 60 वाहने त्याच्या मृतदेहावरून गेली. मृतदेह अक्षरश: चिरडला गेला होता. पोलिसांनी विखुरलेल्या मृतदेहाचे अवशेष एकत्रित केले. मृत व्यक्तीची ओळख त्याच्या शर्टच्या खिशातून सापडलेल्या कागदपत्रातून केली. माहितीनुसार, रस्त्यावर दीडशे मीटरपर्यंत या मृतदेहाचा रक्तस्त्राव पसरला होता.