रहस्यमयी गोष्ट ! AAP च्या आमदाराच्या ताफ्यावर प्राणघातक ‘हल्ला’, बदला घेण्यासाठी रचला होता भयानक ‘कट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे नेते विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा जल्लोष साजरा करत आहेत. राजधानी दिल्लीत प्रत्येक ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. अशातच मेहरौलीचे नवनिर्वाचित ‘आप’ चे आमदार नरेश यादव यांचा ताफा मंगळवारी उशिरा इलाक्यातून जात होता. आमदार खुल्या जीप मध्ये बसले होते आणि त्यांचे काही समर्थक आणि पार्टीचे कार्यकर्ते ढोलताशावर थिरकत होते. पण अशातच आमदारांच्या ताफ्यावर गोळीबार झाला. या गोळीबारामुळे सगळीकडे अफरातफरी माजली.

आमदारांच्या ताफ्यावर हल्ला
या गोळीबारामुळे सगळीकडे अफरातफरी माजली आणि त्यामुळे सर्व गर्दी इकडे तिकडे पसरली. हल्लेखोर जीपवर निशाणा साधत गोळीबार करीत होते, त्यावर आमदार नरेश यादव आणि त्यांचे समर्थक स्वार होते. दरम्यान गोळ्यांचा आवाज थांबला होता. आमदारासमवेत जीपवर बसलेला एक माणूस रक्तरंजित होऊन पडले होते. या हल्ल्याने अजून एक जण जखमी झाला. हल्ला झाल्यानंतर समजले की एका खास व्यक्तीला टार्गेट करून हा हल्ला करण्यात आला होता आणि हा व्यक्ती म्हणजे अशोक मान हे होते. अशोक मान हे जीपमध्ये आमदाराच्या मागील बाजूस उभे होते.

दुःखात बदलला विजयाचा माहोल
त्यांच्या शरीरात जवळपास पाच गोळ्या घुसल्या आणि त्याचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या व्यक्तीला देखील गोळी लागली असून तो त्रासाने तडफडत होता. हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी आमदार नरेश यादव खाली वाकले होते. बघता बघता विजयाच्या उत्सवाचे आता शोकात रूपांतर झाले होते. पोलिसांना ही बातमी मिळाली होती. थोड्या वेळाने पोलिस किशनगड फोर्टीज चौकाजवळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

खासदारांनी केले ट्विट
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी त्वरित या हल्ल्याबद्दल ट्विट केले. ही बातमी संपूर्ण राजधानीत आगीसारखी पसरली आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. हा हल्ला कोणी आणि का केला याबद्दल पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आणि घटनेच्या काही तासांनी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतले.

रागातून घडून आला हल्ला
या संदर्भात माहिती देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की तेथे फक्त एकच हल्लेखोर होता. त्याने अशोक मान यांना टार्गेट करून गोळ्या चालविल्या होत्या. त्याने ८ पेक्षा जास्त वेळा बंदुकीच्या फेऱ्या झाडल्या. ज्यामध्ये अशोक मान यांना ५ तर हरेंद्रला २ गोळ्या लागल्या. प्राथमिक तपासणीनंतर पोलिसांनी हे स्पष्ट केले की हल्लेखोरांचे लक्ष्य हे आमदार नव्हते तर अशोक मान होते. जुन्या रागातून हा हल्ला झाला असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी या हल्ल्यास गॅंगवार म्हणून सांगितले
परंतु प्रश्न असा होता की हल्लेखोरांनी असे भयावह पाऊल का उचलले? त्याने अशोक मान यांना का मारले. या प्रश्नांची उत्तरे देणे बाकी होते. घटनास्थळावरून पोलिसांना ६-७ गोळ्यांचे रिकामे खोके सापडले आहेत. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी ३ जणांवर खुनाचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस वेगवान कारवाई करीत होते. त्यामुळे पोलिसांना या रक्तरंजित कारस्थानात सामील झालेल्या तिघांची नावे मिळाली आणि त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आमदार नरेश यादव यांच्यावर नव्हता निशाणा
कालू, धामी आणि देव अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण किशनगड गावचे रहिवासी आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मृत अशोक मान आणि जखमी हरेंद्र हे देखील किशनगड गावचे रहिवासी होते. पोलिसांनी कालूला कोठडीत घेतले आणि चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. या हल्ल्यात त्याचा सहभाग असल्याचे त्याने कबूल केले. आरोपी कालूने खुलासा केला की ते लोक आपच्या आमदारावर हल्ला करायला आले नसून त्यांचे लक्ष्य अशोक मान आणि त्याचा पुतण्या हरेंद्र हे होते. ते फक्त या दोघांना मारण्यासाठी आले होते.

हे होते हल्ल्याचे कारण
यानंतर, या थरारक हल्ल्याचे रहस्य उलगडत गेले. कालू यांनी पोलिसांना सांगितले की अशोक मान यांच्या अगदी जवळ गेल्यानंतर त्यांना ५ गोळ्या लागल्या आणि हरेंद्रला २ गोळ्या लागले. पोलिसांनी कालूला विचारले की त्याने अशोक मान आणि हरेंद्रवर हल्ला का केला? तर त्याने हल्ल्यामागील कारण स्पष्ट केले आणि सांगितले की गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कालूच्या पुतण्यावर हल्ला झाला होता, त्या हल्ल्यात त्याच्या पायाला गोळी लागली होती. हल्ल्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणात ४ जणांना अटक केली. पण कालू याला असा संशय होता की त्याच्या पुतण्यावर हल्ला दुसऱ्या कुणी नाही तर अशोक मान यांनी केला होता.

तथापि त्या एफआयआरमध्ये अशोक मान यांचे नाव नव्हते. या संशयाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित आमदार नरेश यादव यांच्यासह काफिलेत अशोक मान आणि त्याचा पुतण्या हरेंद्र सहभागी झाल्यावर मंगळवारी रात्री कालूने त्यांच्यावर सूड घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना लक्ष्य केले. आता ज्या शस्त्रावरून ही घटना घडली आहे तिचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत.