‘आप’ची ताकद आणखी वाढणार ! ‘फेमिना मिस इंडिया दिल्ली-2019’ हा किताब मिळवलेली मानसी सेहगलचा AAP मध्ये ‘एन्ट्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ‘फेमिना मिस इंडिया दिल्ली-2019’ हा किताब मिळवलेली मानसी सेहगल हिने आम आदमी पक्षात (आप) प्रवेश केला आहे. मानसीने राजेंद्रनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राघव चड्ढा यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. मानसी सेहगल ही प्रशिक्षित इंजिनिअर, टेडएक्स स्पीकर आहे. तसेच तिचे स्वत:चे स्टार्टअपही आहे.

मानसी सेहगल हिच्या ‘आप’प्रवेशादरम्यान आमदार चड्ढा म्हणाले, ‘मला आनंद आहे की आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल हे तरुणांना राजकारणाशी जोडणे आणि लोकांची सेवा करण्यासाठी विश्वास निर्माण करत आहेत. आम आदमी पक्ष दिवसेंदिवस वाढत आहे. मी मानसीचे ‘आप’ परिवारात स्वागत करतो. शेकडो नवे लोक आपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे पक्षाला ताकद मिळत आहे’.

‘आप’मध्ये प्रवेश केल्यानंतर मानसी सेहगल म्हणाली, ‘समाजासाठी कमी वयात काहीतरी चांगले करण्यास इच्छुक आहे. कोणत्याही देशात प्रगतीसाठी आरोग्य आणि शिक्षण हे दोन मुख्य आधार असतात. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वात या क्षेत्रांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बदल दिसला आहे.

महिलांनी ‘आप’मध्ये यावं

मुख्यमंत्री केजरीवाल यांचे सरकार आणि आमदार राघव चड्ढा यांच्या मेहनतीने प्रेरित होऊन मी आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मला असे वाटते, की स्वच्छ राजकारणातून जगात एक मोठा बदल घडवू शकतो. तरुण आणि विशेष करून महिलांनी आपमध्ये सामील व्हावे आणि राजकारण बदलावे, अशी मी आशा करते.