दिल्लीतील ‘या’ 6 विधानसभा जागांवर मुस्लिमांनी AAP मिळवून दिला मोठा विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणूकीत नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि शाहीन बाग हे निवडणूकीचे मुद्दे ठरले यात वाद नाही. परंतु 6 विधानसभा जागा अशा आहेत जेथे मुस्लिम मतदारांना ‘आप’ ला मोठा विजय मिळवून दिला.

विशेष बाब म्हणजे सर्व 6 जागांवर दुसऱ्या नंबरवर काँग्रेस नाही तर भाजपचे उमेदवार आहेत. हे सर्व त्या जागा आहेत जेथे मुस्लिम मतदारांची लोकसंख्या 35 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी ओखला विधानसभा मतदारसंघात आपचे उमेदवार अमानतुल्लाह खान जवळपास 80 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते.

या आहेत त्या 6 जागा, जेथे आपला विक्रमी मतदान झाले –
मुस्तफाबाद, सीलमपूर, बललीमरान, मटिया महल, ओखला आणि बाबरपूर हे असे विधानसभा मतदारसंघ आहेत जेथे मुस्लिम मतदारांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 35 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. काही मतदारसंघात मतांचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

6 मतदारसंघातील विक्रमी मतदान –
1. मुस्तफाबाद – आप (98,681), भाजप (35,691)
2. सीलमपुर – आप (72,611), भाजप (35,691)
3. बल्लीमारान – आप (65,612), भाजप (29,434)
4. मटिया महल – आप (67,250), भाजप (17,024)
5. ओखला – आप (1,11,761), भाजप (30,191)
6. बाबरपुर – आप (83,776), भाजप (51,309)

ओखलामध्ये 2015 साली ‘आप’ला मिळाले होते 1 लाखापेक्षा जास्त ‘मतं’ –
2015 साली दिल्ली विधानसभा निवडणूकीत आपचे उमेदवार अमानतुल्लाह खान यांनी या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा 64,532 मतांनी पराभव केला होता. 2015 मध्ये या जागेवर मतदानाचा टक्का 62.57 राहिला होता. आप उमेदवार 1,04,271 मतं मिळाली होती. तर भाजप उमेदवाराला 39,739 मतं मिळाली होती. भाजपचा मतदानाचा टक्का 60.94 राहिला होता. तर यंदा ओखला मतदारसंघात मतदानाचे प्रमाण 58.84 टक्के राहिले.