आपली भानगड घरी कळू नये म्हणून प्रियकरासोबत मिळून मैत्रीणीचीच केली हत्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दिल्लीपासून 60 किमी अंतरावर असलेल्या पलवलमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका मैत्रिणीने आपले गुपित उघड होईल या भीतीने प्रियकराच्या मदतीने तिच्याच मैत्रिणीची हत्या केली. पोलिसांनी आरोपी मैत्रिणीला अटक केली असून फरार प्रेमीचा शोध सुरू आहे. आरोपी मैत्रिणीला भीती वाटत होती की, तिची मैत्रीण कदाचित तिचे प्रेम प्रकरण तिच्या घरी सांगेल. या भीतीने तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून मैत्रिणीचा खून गेला आणि तिचा मृतदेह आग्रा कालव्याजवळील झुडपात फेकून तेथून पळ काढला.

सध्या पोलिसांनी आरोपी मैत्रिणीवर खुनासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करून अटक केली असून आरोपी प्रियकराचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मैत्रिणीचे नाव ऋतू आहे. ती बीएससीच्या अंतिम वर्षाला होती. ऋतूची मैत्रीण ज्योतीने आपला प्रियकर पवन सोबत मिळून तिचा जीव घेतला. आरोपी मैत्रिणीने आपला प्रियकर पवनसह ऋतूची गळा आवळून हत्या केला.

मृताचे वडील रमेश चंद यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीत त्यांनी सांगितले की, त्यांची मोठी मुलगी ऋतू बीएससीच्या अंतिम वर्षाला शिकत होती. ती गुरुवारी सकाळी नऊ वाजता आपली मैत्रीण ज्योतीसह घरातून महाविद्यालयासाठी गेली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविला. पोलिसांनी सांगितले की, मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून ज्योती आणि पवन प्रजापत याच्याविरूद्ध खुनासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मैत्रीण ज्योतीला अटक केली आहे. तर आरोपी पवनचा शोध घेण्यात येत आहे.