कौतुकास्पद ! गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार, कर्तव्य बजावून देतोय शिक्षण

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन क्लासेसवर भर दिला जात आहे. अनेक ठिकाणी ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरु आहे. मात्र स्मार्टफोन, इंटरनेट नसल्याने अनेक विद्यार्थी यापासून वंचित आहेत. अशा मुलांच शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी एका पोलिसांने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. थानसिंह असे या पोलिसाच नाव असून तो दिल्ली पोलीस दलात कार्य़रत आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ असलेल्या साई मंदिरात त्याचे वर्ग भरतात. लॉकडाऊनमुळे काही विद्यार्थ्यांना शिकवणी बंद करावी लागली होती. गरीब कुटुंबातून येणा-या अनेक मुलांकडे स्मार्ट फोन, संगणक, इंटरनेट नाही. त्यामुळे ते ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होऊ शकत नाही, अशा मुलांसाठी त्यांनी शिकवणीचा निर्णय घेतला आहे.

थानसिंह एएनआयशी बोलतांना म्हणाला की, मी खूप आधीपासून विद्यार्थ्यांची शिकवणी घेत आहे. मात्र कोरोना संक्रमणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी क्लास घेण बंद केल होत.पण अनेक विद्यार्थी ऑनलाईन क्लास करू शकत नाहीत. कारण त्यांच्याकडे स्मार्टफोन, संगणक नाही. तेंव्हा मी पुन्हा एकदा क्लास घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार
कोरोनाच्या काळात पोलीस आपल्या कुटुंबीयापासून दूर राहून आपल कर्तव्य बजावत आहेत. लोकांच्या सेेवेसाठी अहोरात्र काम करत आहेत. विद्यार्थ्यांच नुकसान होऊ नये यासाठी पोलीस अधिका-यांनी पुढाकार घेतला आहे. शांतप्पा जीदमनव्वर असे या अधिका-याचे नाव आहे. कर्नाटकातील अन्नपुर्णेश्वरी नगर परिसरात शांतप्पा हे मुजारांच्या मुलांना शिकवत आहेत. ज्यांच्याकडे स्मार्टफोन, संगणक नाही, अशा मुलांना ते वेळात वेळ काढून शिकवतात.

अन् शिक्षकांने घरासमोर आणली शाळा
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या गाईडलाईन्स पालन करत क्लास घेण्यात येत आहे. मुलांना वर्गात मास्क आणि सॅनिटायझरही उपलब्ध करून दिल जात आहे. तसेच वर्गात सोशल डिस्टसिंगचेही पालन केले जात आहे. कोरोनाच्या संकटकाळात एका शिक्षकांने घरासमोर शाळा आणली आहे. मुलांसाठी त्याने मोहल्ला क्लासेस सुरु केले असून मुलांना त्यांच्या घराजवळ जाऊन शिकवत आहे. आपल्या दुचाकीला फळा लावून ते प्रवास करतात आणि विद्यार्थ्यांना शिकवत असल्याची माहिती मिळाली आहे. रुद्र राणा असे या शिक्षकाच नाव असून ते छतीसगडमधल्या कोरिया जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षक आहेत.