दिल्ली हिंसाचारातील पिडीतांना भेटण्याची आणि शांती प्रस्थापित करण्याची जबाबदारी AAP ची, BJP नं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्ली येथील हिंसाचाराबद्दल भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीच्या दंगलग्रस्त भागात जाण्याऐवजी विधानसभेत या दंगलीत मरण पावलेल्यांचा धर्म सांगत आहे. प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधाताना काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आज राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेल्या. यावेळी त्यांनी भाजपला दोषी ठरवलं.

मणिशंकर अय्यार यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन सांगितले की आम्हाला शाहीन बागेकडून खूप अपेक्षा आहेत. सलमान खुर्शीद आणि शशी थरूर यांनी याचे समर्थन केले. तर आपचे आमदार ताहिर हुसेन यांचे घर हे हिंसाचारासाठी वापरण्यात आले. त्यांच्या घरामध्ये हिंसाचारासाठी लागणारे साहित्य आढळून आले तरी देखील काँग्रेसचे मौन का आहे ? असे म्हणत प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले.

राहूल गांधी आणि सोनिया गांधींवर आरोप
प्रकश जावडेकर यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर आरोप केले आहेत. दिल्लीत झालेला हिंसाचार दोन दिवसांचा नसून दोन महिन्यांपासून लोकांना भडकवले जात आहे. सीएए विधेयक पास झाल्यानंतर राम लीला मैदानावर सोनिया गांधी यांनी मेळावा घेतला. त्या म्हणाल्या होत्या ही लढाई आर-पारची असून यावर निर्णय घ्यावाच लागेल. लोकांना भडकवण्याचे काम तेथूनच सुरु झाल्याचा आरोप जावडेकर यांनी केला आहे.

प्रकाश जावडेक पुढे म्हणाले, 14 डिसेंबरला रामलीला मैदानावर सोनिया गांधींनी सांगितले की ही लढाई आर-पारची आहे. यावर निर्णय घ्यावाच लागेल असे सोनियांनी म्हटले होते. तर प्रियंका गांधी यांनी म्हणाल्या होत्या, लाखो लोकांना बंदी बनवले जाईल. जे लढा देत नाहीत त्यांना भित्रे म्हणून हिणवले जाईल. तर राहुल गांधीनी तुम्ही घाबरू नका, काँग्रेस तुमच्या सोबत आहे असे म्हणत लोकांची डोकी भडकवल्याचा आरोप जावडेकर यांनी केला आहे.

You might also like