Delta Variant | लसीकरणाने तयार होणार्‍या अँटीबाडी समोर निष्प्रभ होतो कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट, शास्त्रज्ञांचा दावा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – Delta Variant | कोरोना महामारीच्या विनाशकारी दुसर्‍या लाटेसाठी जबाबदार असलेल्या डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध (Delta Variant) सुद्धा व्हॅक्सीन खुप परिणामकारक आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या नवीन संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. संशोधनानुसार व्हॅक्सीन घेतल्यानंतर जी अँटीबॉडी तयार होते तिच्यापासून वाचण्यासाठी डेल्टा व्हेरिएंट सक्षम नाही. इम्युनिटी नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनाच्या रिपोर्टवरून समजते की, व्हॅक्सीन घेतलेल्या लोकांचा डेल्टा व्हेरिएंटपासून बचाव झाला.

बीटा व्हेरिएंट अँटीबॉडीला फसवण्यात यशस्वी
वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी फायजरच्या कोविड व्हॅक्सीनने लोकांच्या शरीरात निर्माण होणार्‍या अँटीबॉडीवर संशोधन केले.

संशोधकांना आढळले की, व्हॅक्सीनने निर्माण होणार्‍या अँटीबॉडीजपैकी एक सोडून कोणताही इतर डेल्टा व्हेरिएंट बचाव करण्यात सक्षम नाही. मात्र, कोरोनाचा बीटा व्हेरिएंट अनेक अँटीबॉडीला फसवण्यात यशस्वी ठरला आहे.

 

प्रोफेसर एलबेडी यांनी काय म्हटले…

यापूर्वीच्या संशोधनात वॉशिग्टन युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर अली एलबेडी यांना आढळले की, संसर्गानंतर स्वाभाविकपणे निर्माण होणारी अँटीबॉडी आणि व्हॅक्सीनमुळे निर्माण होणारी अँटीबॉडी दोन्हीही जास्त वेळ राहतात.

मात्र, संशोधकांनी हे सुद्धा मान्य केले की, अँटीबाडीच्या कालावधीसह तिची कक्षा सुद्धा महत्वाची ठरते, म्हणजे ती किती प्रकारच्या व्हेरिएंटविरूद्ध उपयोगी आहे.

डेल्टा व्हेरिएंट जास्त संसर्गजन्य
संशोधनाचे वरिष्ठ सहयोगी लेखक आणि वॉशिंग्टंन युनिव्हर्सिटीमध्ये असोसिएट प्रोफेसर जॅको बून यांनी म्हटले की,
संसर्गाच्या बाबतीत डेल्टा व्हेरिएंटने दुसर्‍या व्हेरिएंटला मागे सोडले,
याचा अर्थ हा नाही की, तो अँटीबॉडीच्या विरूद्ध जास्त प्रतिरोधक आहे.

प्रतिकृती बनवण्याचा वेग महत्वाचा
एखाद्या व्हेरिएंटचा संसर्गाचा प्रसार यावर अवलंबून असतो की, तो किती वेगाने आपली प्रतिकृती तयार करतो.
याचे पुरावे मिळालेले नाहीत की डेल्टा व्हेरिएंट व्हॅक्सीनने निर्माण होणार्‍या प्रतिकारतेला मात देण्यात सक्षम आहे.

Web Title :- Delta Variant | america coronavirus delta variant becomes breathless in front of antibodies made by vaccination

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | सायबर चोरट्यांनी Lombard जनरल इन्शुरन्स कंपनीला केले ‘टार्गेट’; कंपनीतून बोलत असल्याचे सांगून देशभरात अनेकांची केली फसवणूक

Pension | आता एकाच व्यक्तीला मिळू शकतो दोन पेन्शनचा लाभ, जारी झाले नवीन नियम; जाणून घ्या

Taliban | तालिबानचा मोठा निर्णय, भारताला धक्का देत आयात-निर्यातीवर घातली बंदी