Delta variant । चिंताजनक ! भारत, अमेरिका, ब्रिटनसह तब्बल 100 देशात डेल्टा वेरिएंटचा प्रसार

जिनिव्हा : वृत्तसंस्था – Delta variant । कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने लोकांची परिस्थिती बिकट करून टाकली आहे. या विषाणूमुळे लोकांची अवस्था भयावह करून सोडली आहे. सध्या कोरोनाच्या (Corona) रुग्ण संख्येत घट होत असतानाच आता मात्र, कोरोनाच्या एका नव्या जातीनं डोकं वर काढलं आहे. देशातच नाहीतर जगात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) डेल्टा वेरिएंटची (Delta variant) भीती निर्माण झाली आहे.

delta variant spreading rapidly presence nearly 100 countries

यामुळे अनेक देशाची चिंता वाढली आहे. तर आतपर्यंत जवळजवळ शंभर देशात डेल्टा वेरिएंट (Delta variant) रुग्ण सापडल्याची माहिती समोर आलीय. मुख्यतः भारतात याचा पहिला रुग्ण आढळला होता. मूळ कोरोनापेक्षा हा डेल्टा वेरिएंट विषाणू जास्त संसर्गजन्य असल्याने सर्वत्र चिंता लागून आहे. (Delta variants spread to over 100 countries including India, USA, UK)

कोरोना विषाणूनंतर आता भारत (India), अमेरिका (USA), ब्रिटन (UK), रशिया (Russia), दक्षिण आफ्रिका (South Africa) आदी देशात डेल्टा वेरिएंट या तीव्र विषाणूमुळे बाधितांचा आकडा वाढू लागलेला दिसतच आहे. तसेच, मागील काही 4 आठवड्यामध्ये भारताच्या 224 जीनोम सिक्वेंसिंगमधील 67 टक्के प्रकरणे ही डेल्टा वेरिएंटशी संबंधित आहेत. तर, GISAID ही विषाणूच्या वेरिएंट (Delta variant) जीनोमला ट्रॅक करत असतात. अशी माहिती ‘ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लुएंजा डेटा’ने (GISAID) दिली आहे. तसेच, 78 देशाच्या GISAID च्या आकड्यांचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळून आले आहे की, भारत, रशिया, ब्रिटन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकासह अन्य देशात डेल्टा वेरिएंट (Delta variant) आपलं घर करतोय.

गेल्या महिन्यातील अर्थात साधारण 29 जूनपर्यंत डेटानुसार, ब्रिटन आणि सिंगापूरमध्ये ज्या नमुन्यांची जीनोम सिक्वेसिंग करण्यात आली होती. त्यामधील 90 टक्के प्रकरणे ही डेल्टा वेरिएंटची असल्याचे समोर आले आहे. तर, विषाणूच्या स्ट्रेनचा वेगाने संसर्ग फैलावत आहे. 29 जून 2021
पर्यंत 96 देशांनी डेल्टा वेरिएंट आढळल्याचे कळवले आहे. परंतु, त्याची शक्यता
कमी असून डेल्टा वेरिएंटची (Delta variant) ओळख पटवण्यासाठी आवश्यकता असलेली
सिक्वेसिंग क्षमता मर्यादित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपल्या साप्ताहिक
रिपोर्टमध्ये सांगितले आहे. दरम्यान, डेल्टा वेरिएंट बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे अन्य
वेरिएंटच्या तुलनेत डेल्टा वेरिएंट हा प्रमुख वेरिएंट बनण्याची शक्यता असल्याचे
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे.

हे देखील वाचा

OBC Political Reservation | राजकीय उद्देश ठेऊन राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं, ‘त्या’ पत्रावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

Crime News | धक्कादायक | डिलिव्हरी बॉयकडून डॉक्टर महिलेवर बलात्कार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : delta variant spreading rapidly presence nearly 100 countries

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update