‘सारथी’ चे अध्यक्ष सदानंद मोरे आता राजीनामा द्याच…

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन

‘सारथी’ ( छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था) संस्थेचे अध्यक्ष म्हणून सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण गेल्या काही दिवसात मराठा समाजासाठी त्यांनी काहीही ठोस पावले उचलली नाहीत या करणामुळे सकल मराठा समाज कोल्हापूर यांच्या वतीने राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबतचा अर्ज पुण्यातील बालचित्रवाणी येथील सारथी च्या कार्यालयात देण्यात आला.
[amazon_link asins=’B07417987C,B071D4MP9T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4f275d16-b5c3-11e8-8435-1d8358ce2b41′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील सारथी या संस्थेची २५ जून २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करून अध्यक्षपदाची जबाबदारी मोरे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. एवढेच नव्हे तर मराठा समाजाच्या उन्नत्ती करिता कमीत कमी एक हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करून तातडीने संस्थेचे कार्य करणे अपेक्षित होते. या अनुषंगाने सरकारच्या वतीने भाषण, लेखन विविध माध्यमांद्वारे मराठा समाजाकरिता काम करीत असल्याचे मोरे यांनी वारंवार सांगितले आहे. मात्र प्रत्यक्षात एक अहवाल सादर जाण्याखेरीज काहीच काम संस्थेकडून करण्यात आलेले नाही. अशी टीका सकल मराठा समाज कोल्हापूर यांच्याकडून करण्यात आली आहे.
कोरेगाव-भीमा हिंसा पूर्वनियोजित; अहवालात ठपका

दरम्यान १ सेप्टेंबर २०१८ रोजी कोल्हापूर येथिल सकल मराठा समाजाकरिता चंद्रकांत दादा पाटील यांनी पाच कोटी रुपयांची तरतूद केल्याचे पत्रादवारे कळवले आहे. मात्र आज पुण्यातील कार्यालयात सकल मराठा समाज कोल्हापूर यांच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली असता त्याठिकाणी काहीही काम सुरु नसल्याचे स्पष्ट दिसून आले. “शासन निधी देऊन आपल्या सारथी संस्थेचे काम सुरु नसेल तर ही खेदाची बाब आहे, तसेच आपण केलेल्या कामाचा आढावा समाजासमोर जाहीर करून या पदावरून मुक्त व्हावे अन्यथा समाजक्षोभास सामोरे जावे” असे सांगत सकल मराठा समाज कोल्हापूर यांच्याकडून मोरे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

Loading...
You might also like