प्रलंबित मागणीसाठी कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – देशव्यापी संप यशयस्वितेसाठी धुळे शहरातील कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात एकुण 46 संघटना सहभागी झाल्या होत्या. कामगारांच्या गेल्या अनेक वर्षापासून 24 प्रलंबित मागण्या आहे. त्या शासनाने मान्य कराव्या या करीता मोर्चात विविध संघटनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

शासनाचे लक्ष वेधण्या करीता शासनाने मागण्या मान्य कराव्या या करीता विविध घोषणा देत कर्मचाऱ्यांनी निषेध केला. मोर्चाला कल्याण भवना पासून सुरवात झाली. संतोषी माता मंदिर, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, जेल रोड, जे बी रोड, शहर पोलीस चौकी, जुना आग्रारोड, कराची वाला खुंट, पारोळा रोड, जुनी मनपा, झाशी राणी चौक, गुरुशिष्य स्मारक चौक, कमलाबाई कन्या शाळा चौक, मार्गाने क्युमाईन क्लब समोर येऊन धडकला. तिथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी संघटनेतील पदाधिकारी यांची भाषणे झाली. कामगारावरील अन्याय सहन केला जाणारा नाही. संघटना कामगारांच्या सोबत आहे. असे आश्वस्त पदाधिकारींनी केले.

कामगारांच्या मागण्या 1) अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करा. 2) सर्व रिक्त पदे कायमस्वरुपी त्वरीत भरा. 3) पाच दिवसांचा आठवडा करा. 4) केंद्रा प्रमाणे वाहतुक, शैक्षणिक आणि हॉस्टेल भत्ता लागू करा. अशा अन्य विविध 24 मागणीचे लेखी निवेदन शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात  जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, वाल्मिक चव्हाण, उज्वल भामरे, कल्पेश माळी, बापु पारधी यांनी सादर केले.  मागण्या शासन दरबारी मांडाव्या व न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/