पुणे : वर्गणीच्या नावाखाली खंडणी मागणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

वर्गणीस्वरुपात खंडणी मागून खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला विश्रांतवाडी पोलीसांनी अटक केली आहे. तर त्याच्या इतर चार साथिदरांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.  हा प्रकार शुक्रवारी (दि.१४) पहाटे साडेतीनच्या सुमारास विश्रांतवाडी चौकातील सुयोग डायग्नोस्टिकजवळ घडला.
[amazon_link asins=’B01KITZRBE,B00IHS3RGQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’50390055-b8e3-11e8-b93a-5f41098fc28c’]

गौरव उर्फ पिट्या सत्यवान वहीले (वय-२७ रा. बुद्धविहार जवळ, भिमनगर, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राहूल सणस (वय-३५ रा. कोथरुड, पुणे) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल सणस हे सुयोग डायग्नोस्टीकजवळ पहाटे साडेतीनच्या सुमारास केबल दुरुस्तीचे काम करत होते. त्यावेळी आरोपी वहीले हा आपल्या इतर चार साथिदारांसोबत त्याठिकाणी आला. वहीले याने या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना काम करण्यास मज्जाव करुन काम करायचे असल्यास दोन मंडळांना वर्गणी देण्याची मागणी केली. या दोन्ही मंडळांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची वर्गणीची मागणी करुन एका गणेश मंडळाला ७० हजार रुपयांची मागणी केली. तसेच पैसे दिले नाहीतर काम करुन देणार नसल्याची धमकी देऊन जीवे मारण्याचीही धमकी दिली. राहूल सणस यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी काही तासात आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक व्हि.एस. मोहिते करीत आहेत.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.