Dengue | मुलांमध्ये ही लक्षणे दिसताच समजून जा डेंग्यू झालाय, असा करा बचाव

नवी दिल्ली : Dengue | डेंग्यूचा संसर्ग एडिस डासांच्या चावण्याने होतो. डेंग्यूच्या डी-२ स्ट्रेनची प्रकरणे देखील आढळतात. डी-२ हा डेंग्यूचा सर्वात धोकादायक प्रकार आहे. त्यामुळे शरीरातील प्लेटलेट्सची पातळी कमी होते. काही प्रकरणांमध्ये रुग्णाचा मृत्यूही होतो. लहान मुलांमध्ये डेंग्यूची लक्षणे गंभीर असू शकतात. लहान मुलांमध्ये डेंग्यूची (Dengue) लक्षणे काय आहेत ते जाणून घेऊया.

जास्त ताप
लहान मुलांना डेंग्यू झाल्यास खूप जास्त ताप येतो. ताप १०० डिग्रीपेक्षा जास्त असतो आणि या काळात पोटात तीव्र वेदना होऊ शकतात.

नाकातून रक्त येणे
तापासोबतच मुलाच्या नाकातून रक्त येत असेल तर ते डेंग्यूचे धोकादायक लक्षण आहे. अशावेळी मुलाला ताबडतोब रुग्णालयात न्या.

उलटी आणि जुलाब
याकाळात होणारे उलटी आणि जुलाब हे देखील डेंग्यूचे लक्षण असू शकते. तापासोबत हा त्रास होत असेल तर ताबडतोब मुलाला डॉक्टरांकडे न्या. (Dengue)

तापात राहू नका बेफिकीर
दिल्ली एम्समधील क्रिटिकल केअर विभागातील डॉ. युधवीर सिंग सांगतात की, या ऋतूमध्ये ताप आल्यास निष्काळजीपणा करू नका. हा ताप डेंग्यू, मलेरिया किंवा टायफॉइड असू शकतो. जर मुलाला जास्त ताप आला असेल आणि दोन दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला तर डेंग्यू किंवा मलेरियाची त्वरित तपासणी करा. स्वत: उपचार करण्याचा प्रयत्न करू नका. चाचणीत डेंग्यूचे निदान झाल्यास ताबडतोब रुग्णालयात जा.

असा करा बचाव

  • मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.
  • घरात पाणी साचू देऊ नका.
  • रात्री मच्छरदाणी वापरा.
  • ताप आल्यास टेस्ट करा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Low Cost Fruit And Vegetables Benefits | सर्व प्रकारच्या रोगांचे शत्रू आहेत ‘ही’
5 स्वस्त कलरफुल फळे आणि भाज्या, आराग्यात ताजेपणा येण्यासाठी रोज खा

Why Do Women Have More Sleep Problems | महिलांना सर्वात जास्त का होते झोपेची समस्या?
जाणून घ्या 3 मोठी कारणे, ‘स्‍लीप डिसऑर्डर’ची ही लक्षणे