Dental Care Tips | दात पिवळे आहेत का? ‘या’ 4 परिणामकारक घरगुती उपायांनी होतील पांढरे शुभ्र आणि चमकदार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Dental Care Tips | पांढरे शुभ्र मोत्यासारखे चमकदार दात (Teeth) केवळ सुंदरच दिसत नाहीत तर तुमच्या तोंडाच्या आरोग्याबद्दलही सांगतात. वयानुसार आपले दात पिवळे (Yellow Teeth) होऊ लागतात. वयानुसार दात पिवळे पडण्याची अनेक कारणे आहेत, जसे की दात स्वच्छ न करणे, धूम्रपान (Smoking) आणि चहा-कॉफी (Tea-Coffee) सारख्या कॅफिनयुक्त पदार्थांचे अतिसेवन (Overdose of caffeinated foods) करणे. दातांचे आरोग्य राखण्यासाठी दररोज दात स्वच्छ करणे आवश्यक आहे. दात सुंदर आणि पांढरे करण्यासाठी वर्षातून एकदा डॉक्टरांकडे जाऊन दात स्वच्छ करून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचे दात पांढरे ठेवण्यासाठी डॉक्टरकडे जात नसाल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही दात स्वच्छ ठेवू शकता. (Dental Care Tips)

 

दात पांढरे शुभ्र करण्यासाठी हे आहेत 5 प्रभावी घरगुती उपाय (Effective Home Remedies Of Bright Teeth)-

1. बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरॉक्साईड (Baking soda and hydrogen peroxide) :
दात स्वच्छ करण्यासाठी, एक चमचा बेकिंग सोडा आणि दोन चमचे हायड्रोजन पेरॉक्साईड मिसळा. ही पेस्ट दातांवर काही वेळ लावून ठेवा आणि नंतर धुवा. बेकिंग सोडा दातांचा पिवळेपणा दूर करेल.

अमेरिकन डेंटल असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे समोर आले आहे की बेकिंग सोडा दात सुरक्षितपणे पांढरे करतो. इतकेच नाही तर बॅक्टेरियाशी लढण्यासाठी आणि दातांचे पिवळे पडणे कमी करण्यातही तो गुणकारी आहे. (Dental Care Tips)

 

2. हळद (Turmeric) :
रात्री झोपण्यापूर्वी टूथब्रशच्या मदतीने दातांवर हळद पावडर लावा आणि काही वेळाने स्वच्छ धुवा. असे केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो.

3. अ‍ॅपल व्हिनेगर (Apple Vinegar) :
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर दात स्वच्छ करण्यासाठी आणि दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. सिचुआन युनिव्हर्सिटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा दातांवर ब्लीचिंग इफेक्ट होतो.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर वापरण्यासाठी, सुमारे 200 मिली पाण्यात 2 चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळून माउथवॉश बनवा. हे माऊथवॉश 30 सेकंद तोंडात ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा. लक्षात ठेवा हा माउथवॉश जास्त वेळ तोंडात ठेवू नका.

 

4. फळे आणि भाज्यांचे सेवन करा (Eat fruits and vegetables) :
फळे आणि भाज्यांचे सेवन हे केवळ तुमच्या चांगल्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या दातांसाठीही महत्त्वाचे आहे.
फळे आणि भाज्या खाल्ल्याने दातांवरील प्लेक दूर होण्यास मदत होते.
स्ट्रॉबेरी आणि अननस ही दोन अशी फळे आहेत जी तुमचे दात पांढरे करतात असे म्हटले जाते.

 

Web Title :- Dental Care Tips | how to get rid of yellow teeth know the best home remedies for whiten teeth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Malegaon Bomb Blast Case | मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्याची संशयित आरोपी समीर कुलकर्णीची मागणी, खटल्याचे कामकाज लांबविल्याचा आरोप

 

Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, द क्रिकेटर्स क्लब संघांचा दुसरा विजय

 

National Pension Scheme | पत्नीला बनवा आत्मनिर्भर, उघडा ‘हे’ अकाऊंट; दरमहिना मिळतील 45 हजार रुपये, जाणून घ्या