डॉक्टर महिलेनं त्याचं गुप्तांगच कापलं, नंतर समजलं ‘नातं’

बंगळुरु : वृत्तसस्था – दातांच्या महिला डॉक्टरला प्रियकराचे गुप्तांग कापल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. 42 वर्षीय या महिला डॉक्टरला बंगळुरुतील कोरामंगला येथील सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्टाने दोषी ठरवत 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सईदा अमीना नहीम असे या महिला डॉक्टरचे नाव आहे.

न्यायालयाने सईदा नहीम यांना दणका देत पीडित प्रियकराला 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. दोषी आरोपी ही मुळची गुरप्पाना पल्या येथील आहे. 29 नोव्हेंबर 2008 मध्ये सईदाने तिच्या प्रियकराने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याने त्याचे गुप्तांग कापले. 11 डिसेंबरला न्या. विद्याधर शिरहट्टी यांनी सांगितले की, पीडित पुरूषाचे त्याचे लग्नानंतर आयुष्य उध्वस्त झाले असून त्याला मानसिक त्रासातून जावे लागले. पैशाने हे नुकसान भरून निघणारे नाही. तरी देखील काही रक्कम नुकसान भरपाई म्हणून निश्चित करण्यात आली असून काही दंड आकारण्यात आला आहे.

सरकारी वकिलांनी न्यायालयात माहिती दिली की, पीडीत मीर अर्शद अली आणि सईदा यांच्यात प्रेमप्रकरण होते. मात्र, मीरचे हे प्रेमप्रकरण संपुष्टात आल्यानंतर त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. यामुळे संतापलेल्या सईदा हिने मिरला क्लिनिक मध्ये बोलावून घेतले. या ठिकाणी त्याला फळाच्या ज्यूसमधून गुंगीचे औषध दिले. ज्यूस पिल्यानंतर मिर बेशुद्ध झाल्यानंतर सईदने दवाखान्यातील साहित्य वापरून त्याचे गुप्तांग कापले. नंतर ती मिरला रुग्णालयात दाखल करून पळून गेली.

सईदच्या वकिलाने ती निर्दोष असल्याचे न्यायालयात सांगितले. सईदाने देखील दवाखान्यात येताना मीरचा अपघात झाल्याचा दावा केला. मात्र न्यायालयाला मीरच्या शरीरावर एकही जखम आढळून न आल्याने सईदाला दोषी ठरवण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/