घाम-दुर्गंधीच नव्हे तर ‘कोरोना’ला शरिरापासून लांब ठेवणार Deodorant

मुंबई : वृत्तसंस्था –  घामाची दुर्गंधी येऊ नये म्हणून आणि आपल्याला ताजंतवानं वाटावं यासाठी प्रत्येक जण डिओडोरंटचा वापर करतो. मात्रा आता हाच डीओडोरंट घाम आणि दुर्गंधी घालवणार नाही तर तुमचे कोरोना विषाणूपासून संरक्षण देखील करणार आहे. कोरोनाच्या काळात कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. यातच आता कोरोनापासून तुमचा बचाव करण्यासाठी बाजारात लवकरच डीओडोरंट कम सॅनिटायझर येणार आहे.

आयआयटी कानपूरचा माजी विद्यार्थी असलेल्या आणि आयआयटी गुवाहाटीच्या प्रध्यपकांनी मिळून डीओडोरंट कम सॅनिटायझर तयार केले आहे. जो आपल्याला ताजंतवानं ठेवणारच आहे. या शिवाय कोरोनालाही आपल्यापासून दूर ठेवण्यास मदत करणार आहे. या दोघांनाही कानपूरमधील फ्रँग्रॅस अँड फ्लेव्हर डेव्हलपमेंट सेंटरमध्ये या डिओवर काम केलं. या डिओमध्ये 80 टक्के इथेल अल्कोहोल, 10 टक्के ग्रीन ऑईल आणि 10 टक्के मॉईश्चराइझर न्यूट्रोजेना ऑईल आहे आणि सुगंधासाठी यामध्ये सुगंधी तेलाचा वापर करण्यात आला आहे.

शशिकांत गंगवारने यांनी सांगितले की, हा डीओडोरंट कम सॅनिटायझर आहे. हा डिओ शरीर आणि कपडे दोघांवरही वापरता येऊ शकतो. यामध्ये सॅनिटायझरचे घटक आहेत. त्यामळे कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी तुम्हाला मदत होईल. यामुळे तुम्ही कोरोना व्हायरसला दूर ठेवूच शकता शिवाय 7 ते 10 तास तुमच्या शरीरालाही ताजंतवानं आणि दुर्गंधीमुक्त ठेवेल. तसेच या डिओचा त्वाचा आणि पर्यावरणावर काहीही दुष्परिणाम होणार नाही. हा सुरक्षित डिओ आहे. त्याच्या सुगंधामुळे टेन्शनही दूर होण्यास मदत होईल. आम्हाला या डिओसाठी पेटंट मिळालं आहे. लवकरच हा बाजारात उपलब्ध करून दिलं जाणार आहे.