‘डिप्रेशन’ हा जगातला सर्वात मोठा आजार !

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

2020 मध्ये डिप्रेशन हा जगातिल सर्वात माेठा आजार असणार आहे. आपल्या आजूबाजूस अनेकजण या आजाराने ग्रस्त असतात. पण आपल्याला त्याची जाणिवसुद्धा नसते. या आजारामुळे अनेकांच्या जिवनातील रस निघून जातो तर अनेकजण आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात. अशावेळी या आजारातून वाचण्यासाठी आणि वाचवण्यासाठी संवादाची गरज असते. त्यासाठी चित्रकथी निर्मीती या संस्थेने तिन भागांची Let’s Talk‘ नावाची मालिका बनवली आहे. डिप्रेशन आजार गृस्तांनी ती जरुर पहावी.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7ccdc5c8-c95a-11e8-ae40-a917718ce5c4′]

“आम्हाला काहीतरी सांगायचे आहे” या भूमिकेतून चित्रकथी निर्मीती या संस्थेची स्थापना झाली. आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात, की ज्या आपल्याला व्यथित करतात. चित्रकथी निर्मीती अशा व्यथिक करणाऱ्या गोष्टींवर भाष्य करत असते. अनेकदा आपण आपल्या जवळच घडणाऱ्या गोष्टींकडे भीतीपोटी दुर्लक्ष करतो किंवा सरळसरळ पलायनवादी भूमिका स्वीकारतो. ती घटना घडून गेल्यावर मात्र त्यावर तावातावाने बोलतो. प्रत्यक्षात ज्यावेळी हस्तक्षेप करण्याची गरज असते त्याचवेळी मात्र गप्प बसतो. अशा आपल्या पलायनवादी भूमिकेवर चित्रकथी निर्मिती द्वारे ‘I am innocent’ ही शाॅर्ट फिल्म बनवली आहे.

[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e91c41d8-ca1f-11e8-b964-677ea88c251a’]

गेल्या काही वर्षांपासून आपल्यावर फ्लेक्स संस्कृतीचे आक्रमण होत आहे. जागोजागी, कानाकोपऱ्यावर नको ते फ्लेक्स आपल्यावर लादले जात असतात. त्यामुळे शहरच विद्रुप होत नाही तर आपल्या बटबटीत संस्कृतीचं दर्शन घडत राहतं. इतकच नाही तर या फ्लेक्सचं विघटन न झाल्याने पर्यावरणाचा मोठाच प्रश्न तयार झाला आहे. यावर चित्रकथी निर्मिती ने “टिनपाट नगरी” अशी तीन भागांची मालिका तयार करण्यात आली आहे.

मालिका पाहण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या….

I am innocent

Let’s Talk Part-1

Let’s Talk part-2

फ्लेक्स संस्कृती -भाग-१ 

फ्लेक्स संस्कृती- भाग-२

फ्लेक्स संस्कृती- भाग-३