डिप्रेशनमुळं महिलांमध्ये वाढतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका ! दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

पोलीसनामा ऑनलाइन – एका ताज्या रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, ज्या महिलांमध्ये डिप्रेशनची लक्षणं असतात त्यांना डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका जास्त असतो. कारण डिप्रेशन आणि या आजारांचा थेट संबंध असतो अशी गोष्ट आता रिसर्चमधून समोर आली आहे.

या रिसर्चमध्ये सहभागी झालेल्या 43.2 टक्के महिलांनी सांगितलं की, त्यांच्यात डिप्रेशनची लक्षणं होती. परंतु यातील केवळ अर्ध्याच महिलांना क्लिनीकली डिप्रेशन डायग्नोज झाला आणि त्यावर उपचार करण्यात आले. डिप्रेशनची शिकार होण्याआधी या महिलांमध्ये क्रोनिक आजारांचा धोका 1.8 टक्क्यांनी जास्त आढळला. डिप्रेशनमध्ये देखील महिलांमध्ये सामान्य महिलांच्या तुलनेत 2.4 टक्क्यांनी या आजाराचा जास्त धोका होता.

रिसर्चनुसार शरीरात सूज डिप्रेशन आणि आजार दोन्हींसोबत संबंध ठेवतो. डायबिटीज आणि हायपरटेंशनसारखे आजारही डिप्रेशनशी संबंधित असतात. या रिसर्चमध्ये असंही आढळलं आहे की, डिप्रेशन आणि दीर्घकालीन आजारांचा समान जेनेटीक असतो.

या रिसर्चमधून जी काही माहिती समोर आली आहे त्यानंतर आता मानसिक आणि शारीरिक आजारांवर उपचार करण्यासाठी त्याचा खूप फादा होणार आहे. या रिसर्मध्ये असंही आढळून आलं आहे की, ज्यांना महिलांना डिप्रेशन आणि आजार होते त्या महिला कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील होत्या. याशिवाय त्या लठ्ठपणाच्याही शिकार होत्या.