कोरोना संक्रमित होती पत्नी आणि मुलगी, मुलीसाठी सुटी न मिळाल्याने डेप्युटी SP ने दिला राजीनामा

झांसी : वृत्त संस्था – झांसीमध्ये कोरोना संक्रमित पत्नी आणि 4 वर्षाच्या मुलीच्या देखरेखीसाठी सुटी न मिळाल्याने एसओ मनीष सोनकर यांनी नोकरीचा राजीनामा दिला. डेप्युटी एसपी रँकच्या अधिकार्‍याने सुटी न मिळाल्याने राजीनामा दिल्यानंतर येथे एकच गोंधळ उडाला आहे. तर दुसरीकडे एसएसपी झांसी यांनी डेप्युटी एसपींचा राजीनामा वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठवला आहे.

झांसीमध्ये सीओ पदावर तैनात मनीष सोनकर यांनी आपली कोरोना संक्रमित पत्नी आणि मुलीच्या देखरेखीसाठी सुटी मागितली होती, ती त्यांना नाकारण्यात आली. सोशल मीडियावर वायरल मनीष सोनकर यांच्या पत्रात आरोप करण्यात आला आहे की, पत्नी कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्यांच्या 4 वर्षांच्या मुलीच्या देखरेखीसाठी घरात अन्य कुणीही नव्हते. 1 दिवस अगोदर आलेल्या सरकारी फॉलोवरच्या आधारावर मुलगी आणि पत्नीला सोडणे योग्य नव्हते. यासाठी त्यांनी एसएसपीला 1 मे रोजी 6 दिवसाची सुटी मागितली, तरीही 2, 3 मे ची ड्यूटी बडागांव मतदान केंद्रावर लावण्यात आली. 2 मे रोजी जेव्हा सुटी मागितली तेव्हा एसएसपीने नवीन आलेल्या फॉलोअरच्या आाधारावर पत्नी आणि 4 वर्षाच्या मुलीला सोडून ड्यूटीवर येण्यास सांगितले, तेव्हा त्यांनी राजीनामा पाठवला.

एसएसपीने सांगितले वेगळे कारण
याप्रकरणात सुटी न देणारे एसएसपी झांसी रोहन पी. कानय यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वेगळेच प्रकरण सांगितले. एसएसपी झांसी यांच्यानुसार, मनीष सोनकर अधिकृत प्रकारे घरात एक फॉलोवर ठेवू शकतात, पण त्यांनी 2 फॉलोवर ठेवले होते. दुसर्‍या फॉलोवरचा खर्च सरकारी तिजोरीतून करत होते, ज्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता आणि सरकारी तिजोरीतून खर्च रोखला होता. ज्यानंतर मनीष सोनकर यांनी दुसरा फॉलोवर पाठवण्याची मागणी केली. 1 फॉलोवरला चोरी करण्याचा आरोप करून हटवले आणि दुसर्‍या पाठवलेल्या फॉलोवरला घाण पसरवत असल्याची तक्रार करून हटवले होते. अशाप्रकारे त्यांच्यासाठी होत असलेला खर्च रोखल्यानंतरच मनीष सोनकर ड्यूटीकडे दुर्लक्ष करू लागले होते.

2 मे पंचायत निवडणूक मतमोजणीच्या दिवशी जेव्हा डीएम आणि एसएसपी झांसी येथील ठिकाणी पोहचले तेव्हा मनीष सोनकर तेथे उपस्थित नव्हते. फोर्ससुद्धा विखुरलेला होता, हे पाहिल्यानंतर जेव्हा एसएसपी यांनी मनीष सोनकर यांना ड्यूटीवर येण्यास सांगितले तेव्हा त्यांनी आपल्या हाताने लिहिलेल्या राजीनाम्याचा फोटो एसएसपी यांना व्हॉट्सअपवर पाठवला. जो वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठवला आहे. तसेच, एसएसपी रोहन पी. कानय यांचे म्हणणे आहे की, कार्यालयात आल्यानंतर मनीष सोनकर यांची 6 दिवसांची सुटी सुद्धा मंजूर केली आहे.