Devendra Fadnavis | प्रलंबित राहिलेल्या ‘त्या’ 111 जणांना MPSC मार्फत नियुक्ती देणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) निवड झालेल्या परंतु EWS कोट्यातून आरक्षणाची (Reservation) अडचण झाल्याने नियुक्ती प्रलंबित राहिलेल्या 111 उमेदवारांना दिलासा देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केली. नियुक्ती प्रलंबित राहिलेल्या 111 उमेदवारांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार मॅटमध्ये (MAT) भक्कमपणे बाजू मांडणार आहे. तसेच या सर्व उमेदवारांना नियुक्ती मिळवून देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (NCP MLA Dhananjay Munde) यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी ही घोषणा केली.

 

एमपीएससीकडून 2019 मध्ये आयोजित केलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत (Civil Engineering Services Examination) 1143 उमेदवार पात्र ठरले होते. यापैकी 1032 जणांना 1 डिसेंबर रोजी नियुक्ती देण्यात आली आहे. परंतु सामजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातून उत्तीर्ण झालेल्या आणि त्यानंतर हे आरक्षण रद्द केल्याने EWS कोट्यातून नियुक्ती देण्याबाबत अडचण झालेल्या 111 अभियांत्यांचे भवितव्य अंधारात होते. या उमेदवारांनी उच्च न्यायालयात (High Court) दाद मागितली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने हे प्रकरण मॅटकडे वर्ग केले.

यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करुन मॅटमध्ये पुढील
सुनावणीमध्ये उमेदवारांची बाजू सरकारने भक्कमपणे मांडून त्या उमेदवारांच्या बाजूने निकाल मिळवून द्यावा.
याशिवाय या उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याची मागणी मुंडे यांनी केली.
मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले,
राज्य सरकारने EWS कोट्यातून अधिनस्त पदांची निर्मिती करण्यास मंजुरी दिली आहे.
या 111 उमेदवारांचा मुद्दा देखील मॅटमध्ये भक्कमपणे बाजू मांडू आणि तात्काळ नियुक्ती मिळवून देऊ,
अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

 

Web Title :- Devendra Fadnavis | 111 candidates will also be appointed through mpsc announces deputy cm devendra fadnavis in vidhan sabha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Salman Khan | सलमान खान व एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीचा ‘तो’ व्हिडिओ चर्चेत, वेधले सगळ्यांचे लक्ष

Rakhi Sawant | “महेश मांजरेकरांनी माझं नाव बदललं”, राखी सावंतने केला मोठा खुलासा

Maharashtra-Karnataka Border Dispute | कर्नाटक सरकारविरोधातील ठराव एकमताने मंजूर, मात्र उद्धव ठाकरेंची ‘ती’ मागणी नाकारली