Devendra Fadnavis | पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांना एका वर्षात 20 दिवसांची नैमित्तिक रजा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | राज्यातील पोलीस दलातील (Maharashtra Police) पोलीस शिपाई (Police Constable) ते पोलीस निरीक्षक (Police Inspector) या पदावरील अधिकारी, कर्मचारी यांना सध्या एका कॅलेंडर वर्षात देय असलेल्या 12 दिवसांच्या नैमित्तिक रजांऐवजी (Casual Leave) जास्तीत जास्त 20 दिवस नैमित्तिक रजा विशेष बाब म्हणून अनुज्ञेय करण्यात आले आहे. याबाबत 3 ऑक्टोबर 2022 ला शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

 

 

सन 2022-23 या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील विधानसभेत उत्तर देतांना उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. गृह ,कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय, सार्वजनिक बांधकाम, उद्दोग, उर्जा व कामगार विभागाच्या सन 2022-23 या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत चर्चा झाली. त्यावर सभागृहातील सदस्यांनी आप आपल्या मतदारसंघातील समस्यां मांडून विविध सूचना केल्या.

 

विधानसभेतील सदस्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येवून त्याविषयी सदस्यांनाकळविण्यात येणार
असल्याचे यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil),
सांस्कृतिक कार्य सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan),
उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant), कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विधानसभेत सांगितले.

 

 

Web Title :-  Devendra Fadnavis | 20 days casual leave from police constable to police inspector in a year – Deputy Chief Minister Devendra Fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Attack On Sandeep Deshpande | देशपांडेवरील हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांची चौकशी करा, मनसे नेत्याची पोलिसांकडे मागणी; राजकीय वर्तुळात खळबळ

MNS Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला; रॉड आणि स्टम्पने केली मारहाण

Pune Crime News | ‘चोरटे’ही ‘रंगले’ कसबा निवडणुकीच्या रणधुमाळीत; जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरीच्या गुन्ह्यात घट