Pune Crime News | ‘चोरटे’ही ‘रंगले’ कसबा निवडणुकीच्या रणधुमाळीत; जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरीच्या गुन्ह्यात घट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कसबा पेठ पोटनिवडणुकीने (Pune Kasba Peth Bypoll Election) संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. या निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उतरले होते. भाजपच्या (BJP) या बालेकिल्ल्यात रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे जायंट किलर ठरले. या निवडणुकीचा प्रचार, मतदान आणि गुरुवारी झालेली मतमोजणी काळात कसब्यासह संपूर्ण शहरात नाकाबंदी, बंदोबस्तात वाढ केली असल्याने त्याचा परिणाम रस्त्यावरील गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. (Pune Crime News)

 

कसब्यातील मतमोजणी गुरुवारी झाली. सोशल मीडियावर या मतमोजणीच्या निकालाची जशी हवा होती. तशीच सर्वत्र चर्चा दिसून आले. त्याचा परिणाम शहरातील गुन्हेगारीवर झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी दिवसभरात शहरातील ३२ पोलीस ठाण्यात केवळ जबरी चोरी व वाहन चोरीचे प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, गर्दी, मारामारी, दुखापत अशा रस्त्यावरील एकही घटना दाखल झाली नाही.

 

शहरात दररोज दोन चार घरफोड्या, ५ ते ६ वाहन चोर्‍यांची नोंद होत असते.
याशिवाय खूनाचा प्रयत्न, मारामारीच्या काही घटना असतात.
गुरुवारी पुणेकरांबरोबरच संपूर्ण राज्याचे कसब्याच्या निकालाकडे लक्ष होते.
पोलिसांचा सर्वत्र बंदोबस्त होता. त्याचवेळी बहुदा चोरटेही निवडणुकीच्या निकालात दंग झाले होते.
त्याचा परिणाम शरीरावरील तसेच मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये मोठी घट झाली असल्याचे दिसून येते.

 

Web Title :- Pune Crime News | ‘Chorte’ also ‘rangle’ in Kasba election battle; Reduction in the crime of forced theft, burglary, vehicle theft

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MNS Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला; रॉड आणि स्टम्पने केली मारहाण

Aurangabad ACB Trap | पेन्शन मंजूर करुन आणण्यासाठी लाचेची मागणी, कृषी अधिकारी कार्यालयातील लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची 14.50 कोटींची फसवणूक, पाषाण परिसरातील प्रकार