महाराष्ट्राच्या क्रीडापटुंवर होणार बक्षीसाची लयलूट; राहिला ५० लाखांचे बक्षीस

वृत्तसंस्था :

इंडोनेशिया येथील जकार्ता येथे १८ व्या आशियायी स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धेमध्ये भारताचे क्रीडापटू चांगली कामगिरी करीत आहेत. या स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या क्रीडापटूसाठी महाराष्ट्र शासनाने भरभक्कम रक्कम जाहीर केली आहे. सुवर्ण पदक मिळवणाऱ्या क्रीडापटुंकरिता रुपये ५० लाख, रौप्य पदकासाठी ३० तर कास्य पदकासाठी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ही माहिती दिली आहे. यंदाच्या आशियायी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या राही सरनोबत ने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिला नेमबाजीत सुवर्ण पदक मिळाले आहे त्यामुळे ५० लाखांच्या बक्षिसाची ती मानकरी ठरली आहे.

[amazon_link asins=’B01K4K6266,B07DC5QRHN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7ebb7a8e-a6b4-11e8-8685-856941adadb6′]

राही सरनोबतला नेमबाजीत सुवर्ण

आशियाई स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनोबतने सुवर्ण पदक जिंकले. तिने २५ मीटर पिस्तुल प्रकारात भारताला चौथे सुवर्ण पदक मिळवून दिले.आशियाई शुटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली. याच प्रकारात भारताची मनू भाकर फायनलमधून बाहेर पडली. राहीचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.

महिलांच्या २५ मी पिस्तुल प्रकारात राहीला सुरुवातीपासूनच थायलंडच्या यांगपाबून हिच्याकडून कडवी झुंज मिळाली. राहीने यावेळी बऱ्याचदा आघाडी मिळवली सुवर्ण पदकासाठीचा राउंड खूपच अटीतटीचा झाला. दोन वेळा थायलंडच्या यांगपैबूनने बरोबरी साधली . त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात राहीने पाच पैकी चार शॉट ऑन टार्गेट मारले. आणि सुवर्णपदक पटकावले.

राहीचे हे आशियाई स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक आहे. यापूर्वी तिने २०१४ मध्ये झालेल्या इंचिओन स्पर्धेत कास्य पदक जिंकले होते. याचबोरबर तिने दिल्ली आणि ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत तसेच २०१३ ला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते.