CM उद्धव ठाकरेंच्या गंभीर इशाऱ्याला देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन देलकर (Mohan Delkar) यांनी २२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील हॉटेल सी ग्रीनमध्ये आत्महत्या केली होती. ‘पूजा प्रकरणात सुसाइड नोट नाही, त्याशिवाय कोणाचे आरोप नाहीत, तरीही गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. मात्र मोहन देलकर यांच्या आत्महत्येनंतर १३ ते १४ पानांची सुसाइट नोट सापडली आहे. त्यामध्ये अनेक नावांचा उल्लेख असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांच्या आत्महत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यावर कोणतीच चर्चा वा मागणी होत नसल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दादरा-नगर हवेलीचे प्रशासक डेलकरांचा छळ करीत होते, भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव होता, असे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून भाजपला गंभीर इशारा दिला होता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पेटलेला आहे. पण या प्रकरणात भाजपच्या कोणत्याही नेत्याचे नाव नाही, असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. ‘मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. आमची सुद्धा या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी आहे. मी दाव्यानिशी सांगतो की, या प्रकरणात भाजपच्या कोणत्याही नेत्याचे नाव नाही’, असं फडणवीस यांनी सांगितलं.

‘राज्यतील पेट्रोलचा दर देशतील ९ राज्यांपैक्षा जास्त आहे. महाराष्ट्राने २७ रुपये टॅक्स पेट्रोलवर लावले आहे. नाना पटोले यांचं आंदोलन त्यांच्याच सरकारच्या विरोधात असावं. अजित दादा राज्यातील पेट्रोलचे दर काही कमी करणार आहेत म्हणून त्याचं श्रेय घेण्यासाठी नाना पटोले आंदोलन करत आहेत’, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: लस घेऊन लसी संदर्भातील संभ्रम दूर केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी चेहऱ्यावर मास्क असतानाही ते स्पष्ट दिसत होतं तुम्हाला कोणाला साधू संत ठरवायचं असले तर तो तुमचा प्रश्न आहे, असंही फडणवीस म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्या हे राज्यपालांनी सांगितलंय पण अजित पवार का घाबरतात. त्यांचे आमदार फुटतील आणि अल्पमतात सरकार जाईल अशी भिती त्यांना वाटत आहे, असा टोलाही फडणवीस यांनी अजितदादांना लगावला. वरळीचे जे लोक आहेत तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचं ऐका, रात्रभर त्या ठिकाणी पब सुरू आहे. नाईट लाईफ चाललंच पाहिजे. मुख्यमंत्री केवळ जनतेला सल्ला देतात. पण मंत्र्यांना देत नही. अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतात, ते मुख्यमंत्र्यांचं ही ऐकत नाही, असा टोलाही फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.