Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

ADV

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर, बहुमत चाचणी (Majority Test) जिंकल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपुरात पोहोचले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी नागपुर विमानतळापासून (Nagpur Airport) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानापर्यंत मिरवणुक काढण्यात आली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना सत्तांतराबाबत गौप्यस्फोट करताना म्हणाले की, पहिल्या 2 महिन्यात खदखद लक्षात आली; नजर ठेवून होतो, योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम केला.

 

नवे सरकार कसे स्थापन झाले, यावर बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे तुमच्यासमोर येईल.
मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) पहिल्या दोन महिन्यातच ही खदखद माझ्या लक्षात आली होती.
या सर्व प्रकारावर मी लक्ष ठेवून होतो. आणि योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम केला.

 

ते पुढे म्हणाले, बहुमत चाचणीत आम्ही 164 मते विरुद्ध 99 अशी ल्यॉन्डस्लाईड विक्ट्री (Landslide Victory) मिळवली.
ही टर्म आम्ही पूर्ण करू. पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात महाराष्ट्राला देशातील नंबर एकचे राज्य बनवू.
2019 सालीच भाजपला (BJP) लोकांची पसंती मिळाली होती, पण चुकीच्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले.

फडणवीस म्हणाले, मविआ सरकार आल्याने मुख्यमंत्रीपद मिळाले नाही याचे दु:ख नव्हते. पण, आलेल्या सरकारने राज्याच्या विकासाची कामे केली नाहीत. मराठवाडा तसेच दुष्काळग्रस्त भागातील कामेही अडकली होती. ते पाहून चिंता वाटायची, याहीवेळेस सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. कोरोनाच्या काळातही जीवाची पर्वा न करता काम केले.

 

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी पुढाकार घेतला.
बाहेर राहून या सरकारला मदत करायची माझी तयारी होती, पण वरिष्ठांनी सांगितल्यानुसार मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा प्रवास पूर्ण होणारच,
आम्ही मिळून काम करू आणि पुढील अडीच वर्ष हे सरकार चालेल आणि आम्ही यशस्वी कामगिरी करून दाखवू, असे ते म्हणाले.

 

सरकारच्या कामाबद्दल ते म्हणाले, आगामी काळात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागातील प्रश्न मार्गी लावू आणि समस्याग्रस्त भागांच्या विकासाच्या दृष्टीने कार्य करू.
जे काही यश मिळाले आहे ते पंतप्रधान मोदी व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामुळेच मिळाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा