Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसाचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत शिवसेनेनं साधला भाजपवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारला (Thackeray Government) हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन कायम कोंडीत पकडत भाजपने (BJP) अखेर राज्यात सत्तांतर घडवलं. शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) केलेल्या आमदारांनी हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरुन आम्ही बंड केल्याचे सांगत भाजप सोबत सरकार स्थापन केल्याचे म्हटलं. त्यानंतर, राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाले, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपमुख्यमंत्री बनले. मात्र ज्या हिंदुत्त्वाच्या मुद्यावर भाजपने सतत शिवसेनेवर टीका केली. याच मुद्यावरुन शिवसेनेनं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक व्हिडिओ शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे.

 

शिवसेनेच्या महिला नेत्या मनिषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा व्हिडिो शेअर केला आहे. यावरून त्यांनी हिंदुत्वाचा सवालही केला. त्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस हे बाबा ताजुद्दीन (Baba Tajuddin) यांच्या चरणी आपण नतमस्तक होत असल्याचे सांगत भाविकांना शुभेच्छा देत आहेत. सय्यद हजरत मोहम्मद बाबा ताजुद्दीन (Hazrat Syed Mohammad Baba Tajuddin) यांचा उरुस दरवर्षी साजरा केला जातो. यंदा उरुसाची शतकपुर्ती होत आहे. त्यामुळे मी बाबा ताजुद्दीन यांच्या सर्व भाविकांना शुभेच्छा देतो आणि बाबा ताजुद्दीनच्या चरणी नतमस्तक होतो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

शिवसेना नेत्या आमदार मनिषा कायंदे (MLA Manisha Kayande) यांनी फडणवीसांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.
तसेच, यासोबत उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) तुलना करणारे कॅप्शन देत भाजपवर निशाणा साधला आहे.
हेच जर उद्धव ठाकरे यांनी केलं असतं, तर त्यांनी हिंदुत्वा सोडलं असा अपप्रचार केला असता.
असं कॅप्शन आमदार कायदे यांनी दिले आहे.
भाजपकडून सातत्याने शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्यावरुन होत असलेल्या टीकेला कायंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यावर भाजप कशा प्रकारे प्रत्युत्तर देते हे पहावे लागेल.

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader devendra fadanvis obeisance to baba tajuddin shivsena targets bjp by sharing devendra fadnavis video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा