Pune Pashan Lake | पुणे महापालिकेचा दणका, पाषाण तलावालगतच्या उद्यानात प्रेमी युगुलांना ‘नो एन्ट्री’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगर पालिकेने (Pune Municipal Corporation) एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रेमी युगुलांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे. पुण्यातील बहुतांश उद्याने रात्री आठ वाजता बंद होतात. यामुळे काही प्रेमी युगुल संध्याकाळी झेड ब्रिजवर (Z Bridge) ठाण मांडून बसलेले असतात. तर काही पाषाण तलावाच्या (Pune Pashan Lake) परिसरात फिरताना दिसून येतात. परंतु या अविवाहित जोडप्यांना पाषाण तलाव परिसरात (Pune Pashan Lake) बसण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे.

 

 

पालिकेच्या उद्यान विभागाने पक्षी निरीक्षण (Bird Watching) करणाऱ्या नागरिकांना अडथळी होत असल्याने पाषाण तलावाच्या परिसरात (Pune Pashan Lake) अविवाहित जोडप्यांना फिरण्यावर आणि बसण्यावर बंदी घातली आहे. पाषाण तलाव परिसरात झाड व वृक्षांची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी विविध जातींच्या पक्षांचा वावर आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षक प्रेमी असणारे नागरिक तिथे फिरत असतात. परंतु याठिकाणी जोडप्यांची संख्या वाढत असल्याने पक्षी निरीक्षकांना याचा अडथळा होत आहे.

याबाबत पक्षी निरीक्षक आणि परिसरातील नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली होती. या पूर्वीही परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून पाषाण तलावाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. मैलापाणी येऊ नये, जलपर्णी वाढू नये, परिसरातील जैवविविधता (Biodiversity) कायम राहावी. यासाठी नागरिकांचे प्रयत्न सुरु आहेत. जेणेकरुन पक्षांचा आणखी वावर या ठिकाणी वाढेल.
परंतु या ठिकाणी जोडपे फिरत असल्याने पक्षी निरीक्षकांना याचा त्रास होत होता.
पुणे महापालिकेने याची दखल घेत अविवाहित जोडप्यांना दणका दिली आहे.
अविवाहित जोपड्यांनी येथे फिरु नये अन्यथा कारवाई केली जाईल असा ईशारा पालिकेने दिला आहे.

 

Web Title :- Pune Pashan Lake | pune pashan talav will closed for couples

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा