Devendra Fadnavis | ‘हे खरं आहे की लग्नाच्या पूर्वी…’ 35 पुरणपोळ्यांवर फडणवीसांनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या आवडीच्या पदार्थांबाबत (Favorite Food) अनेक गोष्टींचा खुलासा त्यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस एका बैठकीत किती पुरणपोळ्या (Puranpoli) खाऊ शकतात ? असा प्रश्न अमृता फडणवीस यांना केला होता. त्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे 30 – 35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तुपासोबत खायचे असं म्हटलं. यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण (Explanation) दिले आहे.

 

अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एका बैठकीत किती पुरणपोळ्या खाऊ शकतात ? या प्रश्नाचं उत्तर देताना ते 30 – 35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत (Ghee) खायचे असं म्हटले होते. त्यापाठोपाठ लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती ? असे विचारले. यावर अमृता फडणवीस यांनी 30 – 35 पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या असे सांगितले होते.

एका वृत्तसमूहाच्या कार्यक्रमात अमृता फडणवीसांनी केलेल्या दाव्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले.
यावर हसून फडणवीस म्हणाले, हे बिलकुल खरे नाही. माझ्या लग्नाच्यावेळी (Wedding) पंगतीला बसलेलो असताना माझ्या मित्रांनी अमृता यांची गंमत केली की मला पुरणाच्या पोळ्या खाऊ घाला.
कधीतरी मी 35 पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या होत्या असे मित्रांनी सांगितले.
तेच अमृताच्या डोक्यात होते. पण त्यांनी लग्नानंतर कधीही त्या खाल्ल्या नाही हेही सांगितले.
पण हे खरं आहे की लग्नाच्या पूर्वी कॉलेजमध्ये (College) एकदा शर्यत लावून सात ते आठ पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या.
आता त्याही खाऊ शकत नाही, असं फडणवीस यांनी म्हटले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis explains puranpoli eating habit exposed by amruta fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा