Multibagger Penny Stock | 38 पैशावरून 42 रुपयांवर पोहचला ‘हा’ शेअर, वर्षभरात गुंतवणुकदारांचे 1 लाख बनले 1 कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Penny Stock | पेनी स्टॉकची किंमत कमी असते परंतु यात जोखीम खुपच जास्त असते. मात्र, तुम्ही अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता जिचे फंडामेंटल मजबूत आहेत. असाच एक पेनी स्टॉक आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार पैसे गुंतवून करोडपती बनले (Kaisar Corp Share). या स्टॉकचे नाव कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड Kaiser Corporation Limited (KCL) आहे. (Multibagger Penny Stock)

 

हा पेनी स्टॉक गेल्या काही दिवसांपासून सतत अप्पर सर्किटला धडकत आहे आणि एका वर्षात हा स्टॉक 38 पैशांवरून 42 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत, त्याने आपल्या शेअरधारकांना सुमारे 11,176.32% रिटर्न दिला आहे.

 

कंपनी शेअर प्राईस हिस्ट्री
एका वर्षात, हा स्टॉक 38 पैशांवरून (12 एप्रिल 2021 बीएसईवर बंद किंमत) वरून शुक्रवारी (25 मार्च 2022) प्रति शेअर 42.85 रुपये झाला आहे. कंपनीच्या शेअरने एका वर्षात 11,176.32 टक्क्यांचा जबरदस्त रिटर्न दिला आहे. त्याचवेळी, या पॅकेजिंग मल्टीबॅगर स्टॉकने 2022 मध्ये आतापर्यंत 1,367.47 टक्के रिटर्न दिला आहे. (Multibagger Penny Stock)

Kaiser Corporation Ltd. चा शेअर, जो 3 जानेवारी 2022 रोजी BSE वर 2.92 रुपये होता, तो आता 42.85 रुपये झाला आहे. एक महिन्यापूर्वी या शेअरची किंमत 19 रुपये होती, ज्या दरम्यान त्याने सुमारे 125.41% रिटर्न दिला आहे.

 

गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फायदा

जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी कैसर कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये 38 पैसे दराने 1 लाख रुपये गुंतवले असते,
तर आज ही रक्कम 1.12 कोटी रुपये झाली असती.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षाच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी (3 जानेवारी 2022) या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते,
तर आज ही रक्कम 14.67 लाख रुपये झाली असती.

एक महिन्यापूर्वी, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये 19 रुपये दराने 1 लाख रुपये गुंतवले असते,
तर आज ही रक्कम 2.25 लाख रुपये झाली असती. म्हणजेच एका महिन्यातच ही रक्कम दुपटीने वाढली असेल.

 

काय करते कंपनी
कंपनीची स्थापना सप्टेंबर 1993 मध्ये मुंबईत झाली. 15 मार्च 1995 रोजी कंपनीचे रूपांतर कैसर प्रेस लिमिटेड या नावाने पब्लिक लिमिटेड कंपनीत करण्यात आले.
5 नोव्हेंबर 2013 रोजी कंपनीचे नाव बदलून ‘कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड‘ असे करण्यात आले.

Kaiser Corporation Limited (KCL) लेबल, स्टेशनरी, लेख, मासिके आणि कार्टन्सच्या व्यवसायात गुंतलेली आहे.
केसीएलने तिच्या उपकंपन्यांद्वारे अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल हीट ट्रेसिंग आणि टर्नकी प्रकल्पांमध्ये देखील काम करत आहे.

 

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger penny stock kaisar corp share delivered huge 11k percent Kaiser Corporation Limited (KCL)

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Modi Government | ‘…तर मला विजय चौकात फाशी द्या’; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य (Video)

 

Pune Crime | भारती विद्यापीठ पोलिसांकडून सराईत चोरट्याला अटक, 9 गंभीर गुन्ह्याची उकल

 

Causes And Prevention Of Snoring | घोरण्याच्या समस्येने त्रस्त आहात का?, ‘या’ सोप्या उपायांनी होईल घोरणे कमी