Devendra Fadnavis | ड्रग्ज प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा इशारा; म्हणाले – ‘…तर साक्षीदारांची विश्वासहार्यता संपुष्टात येईल’

दादरा नगर-हवेली : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | राज्यात मागील काही दिवसांपासून मुंबईतील ड्रग्स प्रकरणावरून (Mumbai Drugs Case) चाललेल्या घडोमोडींवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस आज (मंगळवारी) दादरा नगर-हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ड्रग्ज प्रकरणात अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. तसेच या प्रकरणातील जे साक्षीदार आहेत. त्यांची विश्वासहार्यता संपुष्टात आल्यास नंतर कोणताही साक्षीदार साक्षीसाठी परत येणार नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मी यावर फार भाष्य करणार नाही. पण माझे मत आहे की, अधिकाऱ्यांना धमकी देणे हे बरोबर नाही. जे साक्षीदार त्यांची विश्वासहर्ता संपेल अशी कारवाई झाल्यास पुढे कोणी साक्ष देण्यास पुढे येणार नाही. पण मी मानतो की काही आरोप लागले आहेत तर एनसीबीनेही त्याची चौकशी करावी. असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे फडणवीस म्हणाले, दादरा नगर हवेलीत शिवसेनेने (Shivsena) उमेदवार दिला आहे.
त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेनेने (Shiv Sena) ज्या प्रकारे उमेदवारी देऊन अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
हा संधीसाधूपणा आहे. एका दु:खद घटनेचं राजकारण शिवसेना करत असून ते योग्य नाही.
लोकांना ते आवडणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis reaction on mumbai drug raid case aryan khan ncb officer sammer wankhede

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | रस्ते, पदपथांच्या कामाने ‘कफ्फलक’ झाली स्मार्ट सिटी कंपनी; एटीएमएसचे‘ 58 कोटी रुपयांचे’ ‘दायित्व’ आता पुणेकरांच्या खिशावर

PCMC Recruitment 2021 | 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 199 जागांसाठी मोठी भरती, जाणून घ्या

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 57 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी