PCMC Recruitment 2021 | 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 199 जागांसाठी मोठी भरती, जाणून घ्या

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (Pimpri Chinchwad Municipal Corporation) लवकरच भरती (PCMC Recruitment 2021) घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तब्बल 199 जागांसाठी पदभरती होणार आहे. या भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार या जागेच्या विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.
पदे – एकूण जागा 199
– भरती शिकाऊ उमेदवार (Apprentice in various Trades)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
शिकाऊ उमेदवार (Apprentice in various Trades) – या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी 10 वी, 12 वी आणि ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित ट्रेडनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक. (PCMC Recruitment 2021)
महत्त्वाच्या सूचना –
– ज्या उमेदवारांनी याआधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटीशीप केली आहे अशा उमेदवारांना परत या पदभरतीसाठी अर्ज करता येणार नाही.
– 2019 ते 2021 या शैक्षणिक वर्षांतील पास आउट उमेदवारांनाच या पदभरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
– मराठी टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
– शैक्षणिक गुणांनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी सुरुवातीला उमेदवारांची कागदपत्रं तपासण्यात येणार आहेत.
– उमेदवारांसाठी प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षांचा असणार आहे. प्रशिक्षणासंबंधीचे आणि निवडीसंबंधीचे संपूर्ण अधिकार हे महापालिकेकडे असणार आहेत.
वेतन – संबंधित पदांनुसार 7000 – 8000 रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2021
सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1XQrTy_GME4O5vuc4UpJZWOi9OYLP7Rqy/view
अर्ज करण्यासाठी – https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php
Web Title :- PCMC Recruitment 2021 | pcmc recruitment 2021 openings for iti posts apply here pimpri chinchwad municipal corporation jobs
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update