Devendra Fadnavis | ‘दाऊदच्या बहिणीला मलिकांनी पैसे दिलेत, आता बाळासाहेब ठाकरे असते तर…’; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session 2022) आज सुरूवात झाली आहे. ईडी (ED) कोठडीत असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून विरोधकांनी गदारोळ केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार प्रहार चढवला. सभागृहात नवाब मलिकांच्या (Nawab Malik) राजीनाम्याची मागणी करत फडणवीस म्हणाले, भारताच्या इतिहासात असं कधीही घडलेलं नाही की, एक मंत्री जेलमध्ये असताना तरीही त्याचा राजीनामा नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

डॉन दाऊदसोबत (Don Dawood Ibrahim) व्यवहार आणि त्याची बहीण हसीना पारकरला (Haseena Parkar) पैसे दिल्याचा आरोप आहे. मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट (Bomb blast) झाले त्या बॉम्बस्फोटांच्या आरोपींसोबत व्यवहार करून हसीना पारकरला पैसे देऊन जे हे काम केलं आहे त्यासाठी ही अटक केली आहे. मात्र अशी अटक झाली असतानाही एखादा मंत्री मंत्रिपदावर राहतो हे नैतिकेतेला धरून नसल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.

आमच्या अपेक्षा फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून (CM Uddhav Thackeray) आहेत.
आज जर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर एक मिनिटात त्यांना मंत्रिपदावरून काढून टाकलं असतं.
मुंबईसोबत (Mumbai) गद्दारी केली, मुंबईत बॉम्बस्फोट केला त्या अपराधींसोबत जमीन खरेदी केली.
त्यासोबतच त्यांनी हसीना पारकरला 55 लाख रूपये दिले. हसीन पारकर कोण तर दाऊदची बहिण म्हणजे त्या स्फोटातील लोकांना मदत केल्यासारखं असल्याचं जहरी टीका फडणवीस यांनी केली.

 

दरम्यान, भाजपच्या आमदारांनी (BJP MLA) विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.
यावेळी त्यांनी निदर्शने करत नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis said babasaheb thackeray would remove minister from cabinet over nawab malik gives money to dawood ibrahim sister allegation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा