Devendra Fadnavis | ‘भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर…’, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना इशारा (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) निकालावरुन आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अनिल परब (Anil Parab) यांनी सगल दुसऱ्यादिवशी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल कशी निकालाची अर्धवट माहिती दिली ते सांगितले. तसेच नैतिकतेचा मुद्दा धरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अतिशय स्पष्टपणे 16 आमदारांच्या अपात्रतेचा सर्व अधिकार अध्यक्षांना दिले आहेत. अशा प्रकारे जर स्पिकरवर दबाव आणण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते फ्री आणि फेअर अश्या प्रकारच्या न्यायप्रक्रियेत बसत नाही. मला वाटत नाही की स्पीकर कोणत्याही दबावाला बळी पडतील. जे कायद्यात आहे, जे संविधानात आहे. जे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) हा निर्णय करतील, योग्य सुनावणी करत योग्य तोच निर्णय देतील अशी अपेक्षा आहे, असे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा
अधिकार नाही. कारण जे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे फोटो लावून निवडून आले,
ज्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी विचार, युती, आणि पक्ष सोडला, ते कोणत्या अधिकाराने नैतिकता सांगत आहेत,
असा सवाल करत त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर देखील निशाणा साधला.

शरद पवार यांचा नैतिकतेचा संबंध आहे का? जर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच भाजपला (BJP)
नैतिकता शिकवायची ठरवली तर कठीणच जाईल. इतिहासात जावे लागेल.
वसंतदादांचं सरकार कसं गेलं इथपासून सुरुवात होईल.
ते ज्येष्ठ नेते आहेत, समजून घ्यावे, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

Web Title :-  Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis warning to sharad pawar if you decide to teach morality to bjp we will have to go to history

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Accident News | पुणे क्राईम अ‍ॅक्सीडेंट न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन : कात्रज – कोंढवा रस्त्यावर भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यु

Uddhav Thackeray On Rahul Narvekar | ‘जर अध्यक्षांनी काही उलट-सुलट केलं तर…’, उद्धव ठाकरेंचा विधानसभा अध्यक्षांना इशारा (व्हिडिओ)

Pune News | एरंडवणे-कर्वेनगर भागातील प्रलंबीत कामे लवकर पूर्ण करा, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांची मागणी