खा. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर CM फडणवीसांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – बहुचर्चित असलेला विषय म्हणजे उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे जर पक्षात आले तर आम्हाला आनंदच आणि आम्ही त्यांचे स्वागत करू, पण त्यांच्या पक्षप्रवेशच्या निर्णयावर मी काहीच सांगू शकत नाही असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. महाजनयात्रेत आज झालेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री :
मुलाखातीत पत्रकाराने मिस्किलपणे, ‘प्रजा ही राजा आहे असे तुम्ही म्हणता परंतु सध्याची परिस्थिती पाहता काही राजे तुमच्या पक्षात येऊ पाहात आहेत. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल काय म्हणाल ?’ असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘शिवेंद्रराजे याआधीच आमच्या पक्षात आले आहेत आणि उदयनराजे आले तर आम्हाला आनंदच होईल, आम्ही त्यांचे स्वागतच करू कारण ते शिवछत्रपतींचे १३ व्या पिढीचे वंशज आहेत आणि छत्रपतींचा मान देशभरात मोठा आहे. आम्ही छत्रपतींच्या नावाने आम्ही राज्य करतो आणि ते आपल्या सर्वांचीच प्रेरणा आहेत.’ ते पुढे म्हणाले की त्यांच पक्षप्रवेशाच्या निर्णयाबद्दल मात्र मी भाष्य करू शकत नाही कारण त्यांचा निर्णय दुसरा कोणीच सांगू शकत नाही. ते स्वतःच याबद्दल तुम्हाला सांगू शकतील.

दरम्यान, शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशामुळे साताऱ्यात राष्ट्रावादीला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी उदयनराजे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीस गेल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी अमित शाह आणि उदयनराजे यांच्या मोबाईलवरील संभाषणाच्या एका मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनुसार अमित शाह यांनी उदयनराजेंना दिल्लीला येऊन भेटण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानंतरही अनेकांच्या भुवया उनाचावल्या होत्या. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडी महत्त्वाच्या ठरत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like