विश्वासघातानं आलेल्या सरकारनं बळीराजाचा ‘विश्वासघात’ केला, देवेंद्र फडणवीसांचा ‘हल्लाबोल’

कोल्ह्यापुर, पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या या निर्णयावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. विश्वासघाताने तयार झालेल्या सरकारने बळीराजाचा विश्वासघात केला आहे अशी टीका फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

कोल्हापूरचे माजी खासदार आणि गेल्या लोकसभेनंतर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले धनंजय महाडिक यांचे सुलत बंधू सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला

अधिवेशनादरम्यान सरकारने केवळ वेळ मारून नेण्याचे काम केले आहे. केलेली कर्जमाफी ही उधारीचे आणि अर्धवट स्वरूपाची आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी सत्तेत येण्याआधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे म्हंटले होते तर मग आता त्यांनी आश्वासन पूर्ण करायला हवे असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली परंतु यातून अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नसल्याचे देखील फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच सध्या देशात गाजत असलेल्या CAA बाबत देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाष्य केले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस CAA बद्दल
CAA बद्द्ल अफवा पसरवल्या जाताहेत यामध्ये काही पक्षांचा मोठा हात आहे देशातील वातावरण खराब करणे हाच त्यांचा हेतू आहे तसेच CAA मुळे कोणत्याही भारतीयांचे नागरिकत्व रद्द होणार नाही कारण हा नागरिकत्व देणारा कायदा आहे नागरिकत्व रद्द करणारा कायदा नाही अशा प्रकारचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिले.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/