Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस बागेश्वर बाबांपुढे नतमस्तक, म्हणाले – ”पुण्याचं भाग्य की…”

पुणे : Devendra Fadnavis | पुण्याचे भाग्य आहे की बागेश्ववर बाबा याठिकाणी आले. त्यांनी रामकथाही सांगितली. जो रामकथा ऐकतो त्याचे आयुष्य सार्थकी लागते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांचे कौतुक केले. आज पुण्यात येऊन ते धारेंद्र शास्त्रींसमोर नतमस्तक झाले.

पुणे शहरात बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दरबार सुरू आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे दर्शन घेतल्यानंतर म्हटले की, बागेश्वर बाबा सनातन धर्माची सेवा करत आहेत. सनातन धर्मासाठी (Sanatan Dharma) जनजागृती करत आहेत. जर भारताची जागृती झाली तर जगाची जागृती होईल.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) जेव्हा सनातन धर्माची गोष्ट करतात तेव्हा अनेक लोक त्यांना नावे ठेवतात. त्यांचा अपप्रचार करतात. सनातन म्हणजे जातीयवाद, परंपरावाद असे काहीजण म्हणतात. पण त्यांना सनातनचा अर्थच कळलेला नाही. सनातनचा अर्थ म्हणजे जे अनादी आणि अनंत आहे ते सनातन आहे. जो सगळ्यांना एकत्र बांधणारा विश्वास आहे, आपण सर्व देवाची लेकरं आहोत या विचाराने सनातन धर्म पुढे जातो आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना बागेश्वर बाबा म्हणाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मी त्यांचे कौतुक करत नाही.
ते रामभक्त आहेत म्हणून मी त्यांच्याविषयी बोलतो आहे, जे रामाचे भक्त असतात ते सगळ्यांचे असतात.
जे रामाचे भक्त नसतात ते कुणाचेच नसतात.

दरम्यान, संत तुकाराम यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले,
मी तेव्हा एक लेख वाचला होता. त्या लेखाच्या आधारे मी त्या भाषेत बोललो होतो.
त्याआधीही मी महाराष्ट्रात आलो होतो. त्यामुळे मला संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी माहिती आहे.
मी त्यांच्याविषयी जेवढे शक्य होते तेवढे वाचले आहे. मी असे कधीही कोणत्याही संताविषयी म्हटलेले नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

संत तुकाराम यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे धीरेंद्र शास्त्री अखेर तुकोबा चरणी लीन, म्हणाले – ”शिवरायांचे स्वप्न…” (Video)