Dhirendra Shastri | संत तुकाराम यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे धीरेंद्र शास्त्री अखेर तुकोबा चरणी लीन, म्हणाले – ”शिवरायांचे स्वप्न…”

पुणे : मागील तीन दिवसांपासून पुणे शहरात बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri) यांचा दरबार भरत आहे. या दरम्यान त्यांनी देहूमध्ये जाऊन संत तुकाराम महाराजांचे (Saint Tukaram Maharaj) दर्शन घेतले. काही दिवसांपूर्वी धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम यांच्याबद्दल संतापजनक वक्तव्य केले होते, त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले होते. मात्र, धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) तुकोबा चरणी लीन झाल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे.

तुकोबांचे दर्शन घेतल्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, देहूत येऊन संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेणे हे माझे मोठे भाग्य आहे. येथील ट्रस्टींनी खूप चांगले स्वागत केले, सर्व माहिती दिली. भारतात संत परंपरा मोठी आहे. हीच परंपरा आपण पुढे नेली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वप्न असलेले हिंदू राष्ट्र लवकरच निर्माण होईल. मी जे बोललो त्याबद्दल मनापासून माफी मागितली आहे. मला कुणाचाही अपमान करायचा नव्हता.

तुकाराम महाराजांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोध होत असल्याने पुण्यात तीन दिवसांच्या दरबारासाठी आल्यानंतर धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दोनदा माफी मागितली. त्यानंतर आज देहूमध्ये जात त्यांनी तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यामुळे आता या वादावर पडदा पडल्याचे म्हटले जात आहे.

संत तुकाराम यांच्याबद्दल काय म्हणाले होते धीरेंद्र शास्त्री…

”संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारले,
तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम महाराज म्हणाले,
मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय?
तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, अरे, प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो.
भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो.
मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो.
प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय.”

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ल्लीच्या तक्ख्तावर धडकणार आरक्षणाचे वादळ! जाट-मराठ्यांचा एकत्र एल्गार

कोर्टात पोहोचण्यास उशीर, दोन पोलिसांना गवत कापण्याची शिक्षा