Devendra Fadnavis | कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायदा रद्द, काँग्रेसने सावरकरांचा धडाही वगळला; देवेंद्र फडणवीसांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले… (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकमध्ये भाजप सरकार (BJP Government in Karnataka) असताना धर्मांतर विरोधी कायदा (Anti-Conversion Act) अस्तित्वात आणला होता. कर्नाटकात सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेसचे सरकार (Congress Government) आले. काँग्रेस सरकारने भाजपने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला आहे. तसेच सावरकरांचा धडाही (Savarkar Lesson) अभ्यासक्रमातून वगळला आहे. यानंतर भाजपकडून यावर सडकून टीका होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा उल्लेख करत हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, सावरकरांना अभ्यासक्रमातून वगळू शकता. मात्र ते लोकांच्या मनातून सावरकर-हेडगेवार यांना काढू शकत नाहीत. ते लोकांच्या मनातून एकही स्वातंत्र्यसंग्रामी काढू शकत नाहीत. काँग्रेसचं सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळं काहीच अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करण्यासाठी कर्नाटकचं सरकार निर्णय घेत आहे.

हा कर्नाटक पॅटर्न राबवणार का?

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, माझा महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) सवाल आहे की, ते महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न (Karnataka Pattern) आणणार म्हणत आहेत तो हाच पॅटर्न आहे का? आता उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय आहे? त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं (Veer Savarkar) नाव पुसायला निघाले आहेत. ते धर्मांतरणाला पाठिंबा देत आहेत, असंही ते म्हणाले.

ठाकरेंची सत्तेसाठी तडजोड

उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता उद्धव ठाकरेंचं मत काय हे त्यांनी सांगावं.
यावरुन उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी ही तडजोड केली हे स्पष्ट होतं. मला असं वाटतं की, असे निर्णय घेऊन
त्यांना कुणाचंही नाव जनतेच्या मानसपटलावरुन पुसता येणार नाही.

Web Title : Devendra Fadnavis | devendra fadnavis first comment on karnataka congress decision on savarkar conversion law

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | ‘दादालाही वेलविशर शोधायला सांगितलंय’, शिंदेंच्या जाहिरातीवरून सुप्रिया सुळेंचा टोला (VIDEO)

Pune PMPML Administration | पीएमपीएमएलकडून स्वारगेट आणि मार्केटयार्ड परिसरातून मुळशी तालुक्यात जाणारे 11 मार्ग पुन्हा सुरू

Maharashtra Politics News | दादा, आमच्यासोबत या, शिंदे गटाच्या मंत्र्याची अजित पवारांना खुली ऑफर