Devendra Fadnavis | भुजबळांच्या नाराजीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, ”राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरील आक्षेप सांगावे, सुधारणा करू”

मुंबई : Devendra Fadnavis | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलेल्या सर्व मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मान्य केल्यानंतर सरकारमधील अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी देखील राज्य सरकारचा हा निर्णय मान्य नसल्याचे जाहीरपणे सांगितल्याने महायुती सरकारची अवघड स्थिती झाली आहे. याबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीदेखील तीच भूमिका आहे. आम्हाला ओबीसीचं आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण करावंच लागेल. मुख्यमंत्र्यांचंही तेच म्हणणं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपा या सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झाले आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही.
उद्या अशी वेळ आली की, आम्हाला ओबीसींना संरक्षण देता येत नाही. तर, मी स्वतः माझ्या वरिष्ठांशी बोलेन.
काहीही झाले तरी ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. भाजपाची हीच भूमिका आहे.

छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझे त्यांना इतकेच सांगणे आहे की, त्यांनी संयम ठेवावा.
मी लवकरच त्यांच्याशी चर्चा करणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर त्यांचे जे काही आक्षेप असतील ते
त्यांनी सांगावे. कुठेही ओबीसींवर अन्याय होत असेल तर त्यात परिवर्तन करू.
आवश्यकता असेल तिथे सुधारणा करू. परंतु, ओबीसींवर अन्याय होऊ देणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी : मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याने सुरक्षा रक्षकाला चाकूने भोसकले

MP Sanjay Raut | ईव्हीएममध्ये भाजपाने निश्चितच घोटाळा केलाय, खासदार संजय राऊत यांचा आरोप

Rajya Sabha Election 2024 | निवडणुकांचं बिगूल वाजलं, महाराष्ट्रासह १५ राज्यांत राज्यसभेची निवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला मतदान

चंदननगर पोलिसांकडून दुचाकी चोरणार्‍याला अटक, 7 वाहने जप्त

पुणे : इंजिनिअरिंगला प्रवेश देण्याच्या बहाण्याने 19 लाखांची फसवणूक

Nashik Crime News | तीन सराईत आरोपींना उपनगर पोलिसांकडून अटक, दोन पिस्टल तीन काडतुसे जप्त

पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरुन दोघांना बेदम मारहण, दोन सराईत गुन्हेगारांवर FIR

फसवणूक प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांच्यासह मुलाविरुद्ध आणखी एक गुन्हा