Devendra Fadnavis | ललित पाटील प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यास ससूनच्या अधिष्ठात्यांची बडतर्फी

कितीही मोठा पोलीस अधिकारी यात गुंतलेला आढळला तर थेट बडतर्फ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | पुण्यातील ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचार घेत असताना ड्रग्ज माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) या कैद्याकडून चालविण्यात येणाऱ्या अंमली पदार्थ तस्करीचे पडसाद विधानपरिषदेत (Legislative Council) उमटले. या प्रकरणात जर ससून हॉस्पिटलच्या डीन विरोधात पुरावे मिळाले आणि आरोप सिद्ध झाले तर त्यांना बडतर्फ करण्यात येईल. तसेच ड्रग्ज प्रकरणामध्ये (Lalit Patil Drugs Case) पुणे पोलीस (Pune Police) संगनमत करताना आढळला, तर तो कितीही वरिष्ठ असो, त्याच्यावर थेट बडतर्फीचीच कारवाई होईल, असा दावा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. यावेळी फडणवीस यांनी 2021 मध्ये ललित पाटीलच्या कस्टबीबाबतच्या पत्राकडे तत्कालीन सरकारने दुर्लक्ष का केले? असा सवाल उपस्थित केला.

महादेव जानकर (Mahadev Jankar), शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), अनिल परब (Anil Parab) इत्यादी सदस्यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा विषय उपस्थित केला होता. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ललित पाटील प्रकरणाचा तपास सुरु असून हॉस्पिटलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या तस्करीत थेट सहभाग असल्या बाबतचे पुरावे मिळाले नाहीत. मात्र, कैद्यांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या दोन पोलीस अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर इतर सहा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरु आहे. कागदोपत्री ललित पाटील याला खूप आजार होते. असे असतानाही तो पळून गेला ही आश्चर्याची बाब असल्याचे फडणवीस म्हणाले.

ललित पाटील प्रकरणाचा तपास सुरू असून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या तस्करीत (Drug Trafficking) थेट सहभाग असल्याचे धागेदोरे हाती लागलेले नाही. मात्र कैद्याच्या संरक्षणासाठी नेमलेल्या दोन पोलीस अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले तर सहा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू आहे. ललित पाटीलला कागदोपत्री भरपूर आजार होते. मात्र तरीदेखील तो पळून गेला ही आश्चर्याची बाब आहे, असे फडणवीस म्हणाले. तसेच ड्रग्ज विरोधात टास्कफोर्स तयार केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

ललित पाटील याला ड्रग्स तस्करी प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) अटक केली होती.
त्याला न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) मिळाली होती.
त्याची पोलीस कोठडी मिळणे आवश्यक असल्याने त्याबाबत उच्च न्यायालयात (High Court) अपिल
करण्यासंदर्भात तत्कालीन पोलीस आयुक्तांनी राज्य शासनाला पत्र लिहिले होते. परंतु अपिल करण्याची परवानगी
मिळाली नाही. ललित पाटील याची एकही दिवस चौकशी होऊ शकली नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | ‘…पटेलांना विनंती करणार ‘मिरची कम’ जेवण द्या,’ उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला जोरदार टोला

सोमवंशी क्षेत्रीय समाज संस्थेची आर्थिक फसवणूक, युको बँकेच्या अधिकाऱ्यांवर FIR

गाणी बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, तीन तरुणांवर गुन्हा दाखल; विनाननगर परिसरातील घटना

Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंबाबत फडणवीस यांचा मोठा दावा, ”त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय माझाच…”