Devendra Fadnavis | शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेंदींनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले-‘राज्यपालांच्या बोलण्याचा… ‘ (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते (BJP National Spokesperson) सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चिघळताना दिसत आहे. त्यांच्या विधानावरुन विरोधकांनी भाजप आणि शिंदे सरकारवर (Shinde Government) टीका सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले असल्याचे फडणवीस म्हणाले. पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक गोष्ट स्पष्ट आहे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या पृथ्वीवर आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे, देशाचे आणि आमच्या सगळ्यांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराजच राहणार आहेत. आमचे हिरो देखील छत्रपती शिवाजी महाराजच (Chhatrapati Shivaji Maharaj) आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही. त्यामुळे मी असं मानतो की यावर काही वाद होण्याचं कारण नाही. मला वाटत नाही की राज्यापालांच्या मनातही काही शंका आहे.

 

याशिवाय राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले आहेत. पण मला असं वाटतं की त्यांच्याही मनात असा कुठलाही भाव नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

 

भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या विधानावर बोलताना फडणवीस म्हणाले, सुधांशु त्रिवेदींचे वक्तव्य मी नीट ऐकलं आहे
आणि कुठल्याही वक्तव्यात त्यांनी महाराजांनी माफी मागितली असं म्हटलेलं नाही.

 

Web Title :- Devendra Fadnavis | Fadnavis’s first reaction to Governor Koshyari and
Sudhanshu Trivendi’s statement regarding Shivaji Maharaj, said- ‘Governor’s speech…’ (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा