Devendra Fadnavis In Pune | डीईएस प्री-प्रायमरी स्कूल मुरलीधर लोहिया मातृमंदिर’च्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis In Pune | ‘डीईएस प्री-प्रायमरी (DES Pre Primary School) स्कूल मुरलीधर लोहिया मातृमंदिर’च्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (5 जानेवारी) दुपारी 3 वाजता करण्यात येणार असल्याची माहिती डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी कळविली आहे. (Devendra Fadnavis In Pune)

 

कुंटे म्हणाले, ‘न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या आवारात नवीन इमारत उभारण्यात आली आहे. डीईएस प्री-प्रायमरी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे वर्ग नवीन वास्तूत स्थलांतरित करण्यात आले आहेत. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून वैविध्यपूर्ण कल्पनांवर आधारित वर्ग, ई-लर्निंगची सुविधा, संगीत, नृत्य व अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र विभाग, सामान्यज्ञानासाठी मॉडेल रूम, सुसज्ज ग्रंथालय, खेळासाठी मैदान, बगिचा, मुलांसाठी विश्रांती कक्ष, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह अशा आधुनिक सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.’ (Devendra Fadnavis In Pune)

कुंटे पुढे म्हणाले, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक औत्सुक्य,
सर्जनशिलतेला प्रोत्साहन, विचार व भावना विकसन, ज्ञानेंद्रिये, स्मरणशक्ती, सामान्यज्ञानात वाढ,
व्यायाम व खेळातून मनोरंजन, स्नायू नियंत्रण, भाषाकौशल्ये व गणिताचा विकास याबरोबर शिस्त,
धैर्य, निरीक्षण क्षमता, चपळता, आत्मविश्वास, राष्ट्रीय व सामाजिक बांधिलकी हे गुण विकसित करण्यासाठी तयार करण्यात आलेला पूर्व-प्राथमिक वर्गांसाठीचा स्वतंत्र अभ्यासक्रम उपयुक्त ठरत आहे.
मूल्यशिक्षणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. पूर्व-प्राथमिकच्या वर्गापासून मौखिक संस्कृत हा विषय शिकविला जातो.’

 

डीईएसचे विश्वस्त जगदीश कदम, प्रभारी कार्यवाह डॉ. आशिष पुराणिक,
सदस्य डॉ. रविंद्र आचार्य, मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरषोत्तमदास लोहिया,
मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis In Pune | Deputy Chief Minister Devendra Fadnavis inaugurated the new building of DES Pre-Primary School Muralidhar Lohia Matrumandir

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mahavitaran Strike | राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, कामगार संघटनांची सरकारसोबत सकारात्मक चर्चा (व्हिडिओ)

Ajit Pawar on Nitesh Rane | टिल्ल्या लोकांनी मला शिकवू नये; अजित पवारांचा नितेश राणेंवर निशाणा

IPS Deven Bharti | वरीष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची बृहन्मुंबईच्या विशेष आयुक्तपदी नियुक्ती