Devendra Fadnavis Meet Raj Thackeray | राज ठाकरे-फडणवीसांची मध्यरात्री भेट, माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Devendra Fadnavis Meet Raj Thackeray | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजपा नेते गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महायुतीसोबत (Mahayuti) जाण्याची भूमिका जाहीर करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ठाकरे हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील आणि नंतर आपली पुढील भूमिका जाहीर करतील असे सांगण्यात आले. त्यानुसार काल मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीबाबत फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Devendra Fadnavis Meet Raj Thackeray)

राज ठाकरे यांच्या मध्यरात्रीच्या भेटीबाबत आज सकाळी प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी कोणतीही माहिती देण्याचे टाळले आहे. तुम्ही रात्री उशिरा राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे, या भेटीत काय बोलणे झाले? असे विचारले असता फडणवीस म्हणाले, आमची भेट रात्री उशिरा झाली की लवकर झाली या भानगडीत तुम्ही का पडता? तुम्ही फार त्या भानगडीत पडू नका. अशा भेटी होत असतात. यात नवीन काय आहे?

दरम्यान, अमित शाह यांच्या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.
महायुतीकडून मनसेला एक किंवा दोन लोकसभेच्या जागा मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
मनसे महायुतीत सहभागी झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळू शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Warje Malwadi Police | वारजे माळवाडी पोलिसांकडून मोक्क्यातील दोन फरार आरोपींना अटक

Earthquake In Marathwada | हिंगोली, परभणी व नांदेडमध्ये भूकंप, रिश्टर स्केलवर 4.5 ची नोंद

Sharad Pawar Sister Saroj Patil On NCP Split | ‘निवडणुका संपल्या की सगळे…’, शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांच्या वक्तव्याने तर्क-वितर्कांना उधाण