Devendra Fadnavis | पडळकरांच्या सुरक्षेसाठी फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘पोलीस त्यांच्या बापाचे आहेत का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकात खडाजंगी पाहायला मिळते. यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ‘मुंडे साहेबांवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली. भुजबळांना दिली गेली. पण गोपीचंद पडळकर संपला पाहिजे, अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर त्यावर लक्ष घालावे. यामध्ये सरकारचा थेट संबंध आहे. पोलीस काय यांच्या बापाचे आहेत का?’ असा प्रश्न देखील फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

 

‘आज जे जात्यात आहेत, ते उद्या सुपात जातील, परिस्थिती बदलते,’ असा सूचक इशाराही फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना दिला. यानंतर तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर देत आमदार गोपीचंद पडळकरांच्या (MLA Gopichand Padalkar) वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

 

सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ‘विधान मंडळाच्या सदस्याचा जीव धोक्यात आहे. सरकारमधले विचारतात पोलीस सुरक्षा कशाला घेता. मला त्यांना विचारायचे आहे, पोलीस त्यांच्या बापाचे आहेत का? आम्हाला हा महाराष्ट्र ठेवायचा आहे, पश्चिम बंगाल करायचा नाहीय. एका आमदाराचा जीव जात असताना आम्ही शांत बसू शकत नाही. त्या पोलीस अधिकाऱ्यांवर बदली आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी, आजचे कामकाज थांबवा आणि आम्हाला दालनाता बोलवा,’ अशी मागणीही त्यांनी केली.

यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) फडणवीसांच्या आरोपांना प्रत्यूत्तर देत म्हणाले, ‘प्रत्येक माणसाला संरक्षण देणे सरकारची जबाबदारी आहे.
राज्यकर्ते कोणीही असले तरी त्यात दुमत नाही. मला राज्यातील जनता गेली 30 वर्षे ओळखते.
तरी काहीजण बोलतात की अजित पवारकडे जबाबदारी दिली तर तो 4 दिवसांत राज्य विकून खाईल,
अरे काय बोलता? अशा शब्दांत अजित पवार यांनी पडळकर यांनी केलेल्या कथित विधानावर नाराजी व्यक्त केले.

 

दरम्यान, ‘मी कोणाच्या अध्यात मध्यात नसतो, फक्त कोणाही पक्षाचा नेता, कार्यकर्ता आला तर विकासाच्या कामांमध्ये लक्ष घालतो.
दोन्ही बाजूच्या सदस्यांनी विधानसभेत, परिषदेत लोकांचे प्रतिनिधी म्हणून पाठवलं जातं, तेव्हा तारतम्य ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे.
फडणवीसांनी मुंडे साहेबांचे उदाहरण दिले, पवार साहेबांची भूमिका माहिती आहेच. संरक्षण देण्याची भूमिका आहेच.
शंभुराज देसाईंशी (Shambhuraj Desai) त्यावर बोललो आहे. फडणवीसांनी आता अधिकची माहिती दिली आहे,
त्यावरून योग्य ती कारवाई करू, असं अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | NCP ajit pawar BJP devendra fadanvis MLA gopichand padalkar attack vidhan sabha Maharashtra Winter Session

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार ! योगेश जगताप खून प्रकरणातील आरोपींनी केले पोलिसांवरच गोळीबार; प्रचंड खळबळ

Pune Crime | पत्नी आणि सासर्‍याच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, हडपसरच्या सातववाडी येथील घटना; दोघांविरूध्द गुन्हा

Driving License | ‘ड्रायव्हिंग लायसन्स’साठी टेस्टचे झंझट संपले ! ‘या’ एका सर्टिफिकेटवर बनू शकते ‘DL’, जाणून घ्या नवीन नियम