Pune Crime | पत्नी आणि सासर्‍याच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, हडपसरच्या सातववाडी येथील घटना; दोघांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पत्नी आणि सासर्‍याच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास (Suicide in Pune) घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईट नोट (Suicide Note) लिहून ठेवली होती. त्यावरुन हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी व सासर्‍याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

योगेश रुपचंद धनवडे (वय २२) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. योगेश यांच्या पत्नी आणि सासर्‍याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुरेखा रुपचंद धनवडे (वय ६५, रा. कुरळप, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी हडपसर (Hadapsar News) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश धनवडे हा सध्या बेरोजगार होता. त्यावरुन पत्नी व सासरे हे त्याला बोलत असत. त्यांच्यात नेहमी भांडणे होत. दोघांच्या त्रासाला कंटाळून योगेश याने सातववाडी येथील घरात १० नोव्हेबर रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून (suicide  note)  ठेवली होती. त्यात त्याने पत्नी व सासरे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. त्याची ही चिठ्ठी नुकतीच सापडली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

Web Title : Pune Crime | Husband commits suicide due to mental distress of wife and father in law, incident at Satavwadi in Hadapsar ; Crime against both

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Tukaram Supe | ‘मन:स्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते’ – तुकाराम सुपे

Driving License | ‘ड्रायव्हिंग लायसन्स’साठी टेस्टचे झंझट संपले ! ‘या’ एका सर्टिफिकेटवर बनू शकते ‘DL’, जाणून घ्या नवीन नियम