आजचे अधिवेशन ‘नियमबाह्य’, देवेंद्र फडणवीसांनी ‘अधिवेशन’ बोलावण्यावर नोंदवला ‘आक्षेप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज महाविकासआघाडीला अग्निपरिक्षेला सामाेरे जावे लागणार आहे. विधानसभेत त्यासाठी अधिवेशन बोलावण्यात आले आहे. परंतू आज होणाऱ्या या बहुमत चाचणीवर आणि अधिवेशनावर फडणवीसांनी आक्षेप नोंदवला. फडणवीस म्हणाले की, आज होणारे हे अधिवेशन पूर्णता नियमबाह्य आहे. अधिवेशन पुन्हा बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज होती. परंतू हे समन्स घेण्यात आले नाही.

फडणवीस म्हणाले की, नव्या अधिवेशनची सुरुवात वंदे मातरम् ने का होत नाही, 27 नोव्हेंबरलाच अधिवेशन स्थगित झाले आहे. या कारणाने देवेंद्र फडणवीस यांनी नियमांवर बोट ठेवले. अधिवेशनच्या कामावर फडणवीसांकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला.

परंतू असे असताना हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीसांचा हा आक्षेप फेटाळून लावला आहे. फडणवीसांचे म्हणणे हंगामी अध्यक्षांनी खोडून काढले. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यपालांच्या आदेशानुसाराच 7 दिवसांच्या आज विधानसभा पुन्हा बोलावण्यात येते. राज्यपालांनी अधिवेशनला परवानगी दिली आहे. हे अधिवेशन पूर्ण पणे कायदेशीर आहे.

Visit : Policenama.com